मुंबईत सत्तासंघर्ष, बारामतीत कौटुंबिक ओढा; सुप्रिया सुळे आशाकाकींच्या भेटीला काटेवाडीत दाखल

पुणे दि 31: राज्याच्या राजधानीत म्हणजेच मुंबईत सध्या मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची चर्चा असतानाच, दुसरीकडे बारामतीत एक वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे. खासदार सुप्रिया सुळे या अचानक काटेवाडीत दाखल झाल्या असून त्यांनी अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांची भेट घेतली आहे.अजित पवार यांच्या निधनानंतर पवार कुटुंब सध्या दुःखात आहे. अशा कठीण प्रसंगी सुप्रिया सुळे यांनी राजकारण बाजूला ठेवून आशाताईंची भेट घेतली. “उद्यापासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत असल्याने मी दिल्लीला जात आहे. जाण्यापूर्वी मी आशाकाकींची परवानगी घेण्यासाठी आले होते,” असे सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.मुंबईत सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीची तयारी सुरू असताना बारामतीतील या भेटीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. कौटुंबिक नात्यातील हा ओलावा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button