
मा. आमदार सुनिलआण्णा टिंगरे यांच्या सूचनेनुसार विश्रांतवाडी परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी विश्रांतवाडी येथील साठे बिस्कीट चौक ते चंद्रमा हॉटेल (डेक्कन कॉलेज चौक) दरम्यानची बीआरटी मार्गिका हटविण्याबाबतचा प्रस्ताव पुणे महानगरपालिका स्थायी समितीच्या बैठकीत मांडण्यात आला होता.
या प्रस्तावाच्या अनुषंगाने दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली होती. त्यानंतर विविध विभागांचे अभिप्राय व तांत्रिक बाबींचा विचार करून आज झालेल्या पुणे महानगरपालिका स्थायी समितीच्या बैठकीत हा ठराव मंजूर करण्यात आला आहे.
सदर निर्णयामुळे या मार्गावरील वाहतूक सुरळीत होण्यास मोठी मदत होणार असून नागरिकांना वाहतूक कोंडीपासून दिलासा मिळणार.
लवकरच संपूर्ण बीआरटी मार्गिका हटविण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
या विषयाचा सातत्याने पाठपुरावा करून नागरिकांच्या मागणीला न्याय मिळवून देण्यात यश आले आहे. परिसरातील नागरिक, व्यापारी व वाहनचालक यांच्याकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे.
या कामांमुळे विश्रांतवाडी, साठे बिस्कीट चौक, डेक्कन कॉलेज चौक तसेच परिसरातील प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक अधिक सुलभ होऊन नागरिकांचा वेळची बचत होणार आहे.