खासदार पार्थ अजितदादा पवार यांचा विवाह २७ फेब्रुवारी २०२७ रोजी बारामती येथे; धार्मिक शंकांचे शंकराचार्यांकडून निरसन

कोल्हापूर – खासदार श्री पार्थ अजितदादा पवार यांच्या विवाहासंदर्भात समाजात व्यक्त होत असलेल्या धार्मिक शंकांचे निरसन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्री उमेश पाटील यांनी पूज्य शंकराचार्यांची भेट घेऊन मार्गदर्शन घेतले व त्याच ठिकाणी विवाहाच्या तारखेची व ठिकाणाची माहिती दिली.

समाजामध्ये कुटुंबातील वडिलांचे किंवा आईचे निधन झाल्यानंतर, कुटुंबात जर लग्नकार्य होणार असेल तर, एका वर्षाच्या आत विवाह करणे आवश्यक असते अन्यथा पुढील 3 वर्ष घरात लग्नकार्य करता येत नाही अशी यासंदर्भात ब
समजूत प्रचलित आहे. या संदर्भात करवीर पीठाचे शंकराचार्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली.करवीर शंकराचार्य पीठाचा छत्रपती शाहू महाराजांशी ऐतिहासिक संदर्भ असल्याने या लग्नकार्याच्या संबंधित प्रचलित रूढी,परंपरा तथा समजूती संदर्भात वस्तुस्थिती समजून घेण्यासाठी मार्गदर्शन घेण्यात आले.

याबाबत माहिती देताना श्री उमेश पाटील म्हणाले की, शंकराचार्यांनी स्पष्ट केले आहे की, कुटुंबातील वडिलांचे निधन झाले असले तरी धर्मशास्त्रानुसार आवश्यक ते विधी व संस्कार योग्य प्रकारे पार पाडणे गरजेचे असते.परंतु एका वर्षाच्या आत विवाह करणे बंधनकारक नसते. त्यामुळे या संदर्भात कोणताही गैरसमज ठेवण्याचे कारण नाही.

दरम्यान, खासदार श्री पार्थ अजितदादा पवार यांचा विवाह २७ फेब्रुवारी २०२७ रोजी बारामती येथे संपन्न होणार आहे. त्यापूर्वी जुलै 2026 या महिन्याच्या २९ तारखेला अत्यंत साध्या आणि कौटुंबिक वातावरणात, मोजक्या नातेवाईकांच्या व फक्त निमंत्रित यांच्या उपस्थितीत साखरपुडा समारंभ पार पडणार आहे.

तसेच, श्री पार्थ पवार यांच्या होणाऱ्या वधूचे नाव “कायनात दारा” असून त्या मूळच्या चंदीगड येथील आहेत व सध्या दिल्ली येथे वास्तव्यास आहेत. मागील काही दिवसांपासून काही माध्यमांमध्ये त्यांच्या जन्म ठिकाणा संदर्भात व नावाच्या संदर्भात चुकीची, त्रुटी पुर्ण व दिशाभूल करणारी माहिती प्रसारित होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर वस्तुस्थिती स्पष्ट व्हावी या उद्देशाने ही अधिकृत माहिती देण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button