
पुणे दि. 31 : पुणे–सातारा महामार्गावरील कात्रज नवीन बोगदा ते नवले पूल दरम्यान स्पीड नियंत्रण कॅमेऱ्यांची गॅन्ट्री बसविण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामासाठी ३ ते ५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत दररोज सकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत साताराकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक तात्पुरती बंद ठेवण्यात येणार आहे.
या कालावधीत होणाऱ्या वाहतूक बदलामुळे वाहनचालकांनी कात्रज जुना बोगदा तसेच सेवा रस्त्यांचा वापर करावा, असे आवाहन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (NHAI) कार्यालयाच्या प्रकल्प संचालकांनी केले आहे.
वाहनचालकांनी वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे व पर्यायी मार्गांचा वापर करून गैरसोय टाळावी, असेही सांगण्यात आले आहे.