उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; राज्यात ३ दिवसांचा दुखवटा जाहीर

मुंबई, दि. २८ : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाच्या (राजशिष्टाचार) वतीने देण्यात आली आहे.

जाहीर करण्यात आलेल्या दुखवट्याच्या कालावधीत महाराष्ट्रातील ज्या-ज्या इमारतींवर नियमितपणे राष्ट्रध्वज फडकविण्यात येतो, त्या सर्व ठिकाणी राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविण्यात येणार आहे. तसेच या कालावधीत कोणतेही शासकीय मनोरंजन कार्यक्रम आयोजित करण्यात येणार नाहीत.

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुःखद निधनामुळे बुधवार, दिनांक २८ जानेवारी २०२६ रोजी राज्यातील सर्व राज्य शासकीय कार्यालये बंद राहतील, असेही शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रभावी आणि अनुभवी नेतृत्व मानले जात होते. त्यांच्या निधनाने राज्याने एक कर्तृत्ववान, कणखर आणि विकासाभिमुख नेतृत्व गमावल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button