‘वन्दे मातरम्‌’ अभ्यासक मिलिंद सबनीस यांचा प्रजासत्ताक दिनानिमित्त विशेष गौरव

पुणे : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत आणि राष्ट्रगीतसम ‘वन्दे मातरम्‌’ या अजरामर गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘वन्दे मातरम्‌’चे अभ्यासक मिलिंद प्रभाकर सबनीस यांचा मानपत्र देऊन विशेष सन्मान करण्यात येणार आहे. याचप्रसंगी ‘वन्दे मातरम्‌’ या विषयावरील मराठी पुस्तिकेचे प्रकाशनही होणार आहे.

स्वानंद फाऊंडेशन आणि संवाद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने हा विशेष कार्यक्रम शनिवार, दि. २४ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५:३० वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास लेफ्टनंट जनरल एस. एस. हसबनीस यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

या गौरव सोहळ्यानिमित्त ‘माँ तुझे सलाम’ हा देशभक्तीपर हिंदी व मराठी गीतांचा विशेष सांगीतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाची संकल्पना स्वानंद फाऊंडेशनचे संजीव शहा यांची असून निर्मिती संवाद पुणेचे सुनील महाजन यांनी केली आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निकिता मोघे करणार असून संयोजनाची जबाबदारी केतकी महाजन-बोरकर सांभाळत आहेत. या कार्यक्रमात जितेंद्र भुरुक, अश्विनी कुरपे, कविता जावळेकर, आकाश सोलंकी, बबलू खेडकर हे कलाकार देशभक्तीपर गीते सादर करणार आहेत.
साथसंगत सोमनाथ फोटके, रोहित साने, रशिद शेख, अमन सय्यद करणार असून निवेदन योगेश सुपेकर यांचे असणार आहे.

हा कार्यक्रम सर्व नागरिकांसाठी खुला असून देशभक्तीची भावना जागवणारा आणि प्रेरणादायी ठरणार असल्याची माहिती स्वानंद फाऊंडेशनचे संजीव शहा आणि साधना शहा यांनी निवेदनाद्वारे दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button