नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीच्या पुणे विभागाच्या संयोजकपदी रेश्मा खान यांची निवड

पुणे : नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीच्या पश्चिम महाराष्ट्र अर्थात पुणे विभागाच्या संयोजक (कन्वेनर) पदावर कोंढवा येथील सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती रेश्मा खान यांची निवड करण्यात आली आहे.

नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या विशेष बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीस समीर पटेल, ॲड. दानीश पठाण, असिफ खान, निलोफर मुल्ला, प्रभु सुनगर यांच्यासह संघटनेचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

अल्पसंख्याक समुदायाच्या हक्कांसाठी सातत्याने कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या म्हणून रेश्मा खान यांची ओळख आहे. शिक्षण, महिला सक्षमीकरण, सामाजिक न्याय आणि मूलभूत अधिकार या विषयांवर त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. त्यांच्या निवडीचे सर्व स्तरांतून स्वागत होत असून, पुणे विभागात अल्पसंख्याकांच्या प्रश्नांना अधिक प्रभावीपणे वाचा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button