
पुणे : गेल्या दहा दिवसांत भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केलेले अथक परिश्रम, प्रभावी घरोघरी प्रचार आणि नागरिकांकडून मिळालेला सकारात्मक प्रतिसाद यामुळे प्रभाग क्रमांक २५ – शनिवार पेठ, महात्मा फुले मंडई परिसरात पुणे शहरातील सर्वात मोठा विजय निश्चित असल्याचा विश्वास भाजपाचे उमेदवार राघवेंद्र बाप्पू मानकर यांनी व्यक्त केला. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी आयोजित भव्य बाईक रॅलीदरम्यान ते बोलत होते.भाजपाची संघटनात्मक ताकद हीच आमची खरी ताकद असल्याचे सांगत मानकर म्हणाले की, आमदार हेमंतभाऊ रासने यांच्या मार्गदर्शनाखाली अवघ्या दहा दिवसांत मंडल अध्यक्ष, सर्व आघाड्यांचे प्रमुख, प्रभाग अध्यक्ष, बूथ प्रमुख, शक्तिकेंद्र प्रमुख तसेच शेकडो कार्यकर्ते घराघरांत पोहोचले. या एकजुटीच्या आणि शिस्तबद्ध प्रचारामुळे नागरिकांचा विश्वास मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.प्रभाग क्रमांक २५ मध्ये भाजपाकडून राघवेंद्र बाप्पू मानकर, स्वरदा बापट, कुणाल टिळक आणि स्वप्नाली पंडित हे अधिकृत उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्या प्रचारार्थ आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.या रॅलीत माजी नगरसेवक दिलीप काळोखे, राजेश येनपुरे, माजी नगरसेविका गायत्री खडके, उदय लेले, मंडल अध्यक्ष अमित कंक, शहर चिटणीस मनोज खत्री, मंडल सरचिटणीस निलेश कदम, किरण जगदाळे, संतोष फडतरे, शहर पदाधिकारी प्रणव गंजीवाले, महिला आघाडीच्या मोहना गद्रे, रुपाली कदम, सुरेखाताई पाषाणकर, उज्वलाताई पावटेकर, प्रभाग अध्यक्ष सुनील रसाळ, युवा मोर्चाचे श्रेयस लेले यांच्यासह असंख्य भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि बाप्पू मानकर मित्र परिवार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.