“११ वर्षांच्या कामाची जनता नक्कीच पोचपावती देईल” – प्रभाग ९ मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयाबाबत अमोल बालवडकर यांचा ठाम विश्वास

पुणे : प्रभाग क्रमांक ९ मध्ये गेली तब्बल ११ वर्षे सातत्याने केलेल्या विकासकामांची जनता निश्चितच पोचपावती देईल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व चारही उमेदवार मोठ्या फरकाने विजयी होतील, असा ठाम विश्वास माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी व्यक्त केला आहे.

प्रभाग ९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारांमध्ये सौ. गायत्री मेढे-कोकाटे, श्री. बाबुराव चांदेरे, सौ. पार्वती निम्हण आणि माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांचा समावेश आहे. सध्याच्या निवडणुकीत प्रभागातील नागरिकांनीच ही लढत आपल्या हातात घेतल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून प्रभागात सातत्याने उपस्थित राहून अमोल बालवडकर यांनी विविध जनोपयोगी उपक्रम राबवले. बाणेर–बालेवाडी परिसरात सुरू असलेल्या संपर्क कार्यालयांमधून आधार कार्ड, पॅन कार्ड यांसारख्या कागदपत्रांपासून ते नागरिकांच्या दैनंदिन अडचणींपर्यंत लाखो कामे मार्गी लावण्यात आली. गेल्या चार वर्षांपासून २५ हून अधिक ट्रॅफिक वॉर्डनच्या माध्यमातून वाहतूक कोंडी कमी करण्याची जबाबदारीही त्यांनी यशस्वीपणे पार पाडली.

‘मिशन निर्मल’ या उपक्रमांतर्गत १०० दिवसांत १०० किलोमीटर परिसर स्वच्छ ठेवण्याचा उपक्रम राबवण्यात आला. सलग १० वर्षे तब्बल १५ हजार कुटुंबांना दिवाळी सरंजाम वाटप करून कोणतेही घर दिवाळीत अंधारात राहू नये याची काळजी घेतली गेली.

याशिवाय प्रभागात २४x७ पाणी योजना, सुस–पाषाण खिंड पूल, स्मार्ट स्ट्रीट व स्मार्ट लाईट्स, ओपन जिम, वृक्षारोपण व हरित उपक्रम, बाणेर येथील महापालिका रुग्णालयाची उभारणी, QRT (Quick Response Team) च्या माध्यमातून रस्ते, पाणी, ड्रेनेज, स्ट्रीटलाइट यांसारख्या तक्रारींवर जलद निर्णय, महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष उपक्रम, क्रीडा व युवा कार्यक्रम, योगा डे, मॅरेथॉन अशा अनेक विकासकामांची अंमलबजावणी करण्यात आली आहे.

या संदर्भात बोलताना अमोल बालवडकर म्हणाले,
“संघर्षाच्या काळात प्रभागातील जनतेने मला दिलेले प्रेम, पाठिंबा आणि विश्वास माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. संपर्क कार्यालये, ट्रॅफिक वॉर्डन, मिशन निर्मल, १० वर्षे १५ हजार कुटुंबांना दिवाळी सरंजाम, २४x७ पाणी योजना ही सर्व कामे जनतेच्या डोळ्यासमोर आहेत. जनतेचा विश्वास हीच माझी खरी ताकद आहे. याच बळावर प्रभाग ९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चौघेही उमेदवार विजयी होतील, असा मला पूर्ण विश्वास आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button