मनाचे आजार मोकळेपणाने स्वीकारूया: आयरा खान

स्किझोफ्रेनिया दिवसा निमित्त परिवर्तनाच्या कार्यक्रमात मांडले मत

पुणे : मानसिक आजाराविषयी जनसामान्यांमध्ये पुरेशी जागृकता नसते. स्किझोफ्रेनिया सारखा तीव्र मानसिक आजार आटोक्यात येवून ती व्यक्ती सामान्य माणसाच्या प्रमाणे आयुष्य जगू शकते याची माहिती बऱ्याच जणांना नसते. या पार्श्वभूमीवर जागतिक स्किझोफ्रिनिया दिना निमित्त ‘जाऊ आनंदाच्या गावा’ हा स्किझोफ्रिनिया सारख्या तीव्र मानसिक आजाराला समोरे जात आनंदाने जगू पाहणाऱ्या रुग्ण आणि नातेवाकाईकांचा कलाविष्कार पत्रकार भवन हाॅल येथे संपन्न झाला.

परिवर्तन संस्था संचालित ‘मानसरंग’ आणि किरण गटाकडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आयरा खान.अगास्तु फाउंडेशन संस्थापक, थिएटर दिग्दर्शक, मानसिक स्वास्थ कार्यकर्ता, परिवर्तन संस्थेचे सं…
[18:46, 5/23/2026] Reshma Kachre Natak: मनाचे आजार मोकळेपणाने स्वीकारूया: आयरा खान
स्किझोफ्रेनिया दिवसा निमित्त परिवर्तनाच्या कार्यक्रमात मांडले मत

पुणे : मानसिक आजाराविषयी जनसामान्यांमध्ये पुरेशी जागृकता नसते. स्किझोफ्रेनिया सारखा तीव्र मानसिक आजार आटोक्यात येवून ती व्यक्ती सामान्य माणसाच्या प्रमाणे आयुष्य जगू शकते याची माहिती बऱ्याच जणांना नसते. या पार्श्वभूमीवर जागतिक स्किझोफ्रिनिया दिना निमित्त ‘जाऊ आनंदाच्या गावा’ हा स्किझोफ्रिनिया सारख्या तीव्र मानसिक आजाराला समोरे जात आनंदाने जगू पाहणाऱ्या रुग्ण आणि नातेवाकाईकांचा कलाविष्कार पत्रकार भवन हाॅल येथे संपन्न झाला.

परिवर्तन संस्था संचालित ‘मानसरंग’ आणि किरण गटाकडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आयरा खान.अगास्तु फाउंडेशन संस्थापक, थिएटर दिग्दर्शक, मानसिक स्वास्थ कार्यकर्ता, परिवर्तन संस्थेचे संचालक डॉ हमीद दाभोलकर राधिका बापट हे उपस्थित होते
प्रमुख पाहुण्या आयरा खान यांनी त्यांच्या मनोगतामध्ये स्वतः मानसिक आजाराची संघर्ष करत आहेत याचा अनुभव मांडला. कला व मानसिक आरोग्य याबाबत सुद्धा मांडणी केली त्याचबरोबर औषधांसकट आजार स्वीकारून वेगवेगळ्या टप्प्यांवरती मानसिक आजारावरती प्रबोधन करण्याचं काम त्या व त्यांची संस्था करत आहे या बद्दल माहिती दिली .मोकळेपणे मनाचे आजार स्वीकारले आणि मदत घेतली तर बरेच प्रश्न सोपे होतात असे.देखील त्यांनी नमूद केले

कार्यक्रमाचे स्वागत रेश्मा कचरे यांनी केले. प्रास्ताविकात डॉ हमीद दाभोलकर म्हणाले की स्किझोफ्रेनिया आजाराशी संघर्ष करणाऱ्या रुग्णमित्र – मैत्रिणींनी व नातेवाईकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी मदत करणारी कुठलीही यंत्रणा आपल्याकडे नाही.अशी यंत्रणा उभी करण्याचा प्रयत्न परिवर्तन संस्था मानसरंग किरण गटाच्या माध्यमातून करत आहे.

कार्यक्रमला स्किझोफ्रेनिया आजाराला.सामोरे जाणाऱ्या मानसमित्रांचे नातेवाईक आणि मानसमित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांनी कार्यक्रमात मनोगीते, मनोनृत्य व मनोगते यांचे सादरीकरण झाले. मुक्ता देशपांडे ,चंद्रकिरण पारुंडेकर व सुरेश डुंबरे यानी कार्यक्रमाचं परिवर्तनचे सूत्रसंचालन केले.

परिवर्तन संस्थेचे विश्वस्त मिलिंद देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मानसरंग संवादक राजू इनामदार यांनी केले.
ब्रहनाथ नीलकंठ ऋषिकेश दळवी आणि परिवर्तनची सातारा-पुणे येथील सर्व सहकारी यांनी कार्यक्रम यशस्वी होण्या साठी प्रयत्न केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button