ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रभाग २५ मध्ये सुसज्ज रुग्णालय उभारणार – राघवेंद्र बाप्पू मानकर

पुणे: प्रभाग क्रमांक २५ मधील ज्येष्ठ नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवेसाठी दूरवर जावे लागू नये, यासाठी प्रभागातच सुसज्ज व अत्याधुनिक रुग्णालय उभारण्याचा संकल्प राघवेंद्र बाप्पू मानकर यांनी व्यक्त केला.

प्रभाग २५ मधील भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ आमदार हेमंत रासने यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या ज्येष्ठ नागरिक मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी राघवेंद्र बाप्पू मानकर यांच्यासह स्वरदा बापट, कुणाल टिळक, स्वप्नाली पंडित हे उमेदवार उपस्थित होते. मेळाव्यास ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

मानकर म्हणाले, “शनिवार पेठ–महात्मा फुले मंडई परिसरात मोठ्या प्रमाणावर ज्येष्ठ नागरिक वास्तव्यास आहेत. नियमित उपचार, तपासण्या आणि आरोग्य सुविधांसाठी त्यांना अन्य भागात जावे लागते. ही अडचण लक्षात घेऊन प्रभागातच सुसज्ज, आधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न केले जातील. माझ्या २४ तास जनसेवा कार्यालयाच्या माध्यमातून आजवर ज्येष्ठांच्या सेवेत राहिलो असून पुढेही हा तुमचा मुलगा सदैव तुमच्यासाठी उपलब्ध असेल.”

या मेळाव्यास भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, माजी नगरसेवक दिलीप काळोखे, राजेश येनपुरे, माजी नगरसेविका गायत्री खडके, उदय लेले, मंडल अध्यक्ष अमित कंक, शहर चिटणीस मनोज खत्री, मंडल सरचिटणीस निलेश कदम, किरण जगदाळे, संतोष फडतरे, शहर पदाधिकारी प्रणव गंजीवाले, महिला आघाडीच्या मोहना गद्रे, रुपाली कदम, प्रभाग अध्यक्ष सुनील रसाळ, युवा मोर्चाचे श्रेयस लेले तसेच भाजपा बुथप्रमुख, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button