अजितदादा पवार यांच्या हस्ते पुणे महापालिकेच्या प्रभाग ९ चा ‘प्रगती अहवाल’ व ‘जनहितनामा’ प्रकाशित

पुणे दि. 11 : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. अजितदादा पवार यांच्या हस्ते पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ९ मधील विकासकामांचा सविस्तर “प्रगती अहवाल” आज प्रकाशित करण्यात आला. याचवेळी प्रभागातील नागरिकांच्या अपेक्षा आणि जनतेच्या हितासाठी तयार करण्यात आलेला “जनहितनामा” देखील अधिकृतरित्या प्रसारित करण्यात आला.

या प्रगती अहवालामध्ये प्रभाग क्रमांक ९ मधील पायाभूत सुविधा, नागरी सोयीसुविधा, राबविण्यात आलेले विविध लोकहितकारी उपक्रम तसेच भविष्यात करण्यात येणाऱ्या विकासकामांचा ठोस आणि नियोजनबद्ध आराखडा मांडण्यात आला आहे. नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणण्यासाठी सर्वसमावेशक, व्यवहार्य आणि कालबद्ध उपाययोजनांचा समावेश जनहितनाम्यात करण्यात आल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिकृत उमेदवार सौ. गायत्री मेढे-कोकाटे, श्री. बाबुराव चांदेरे, सौ. पार्वती निम्हण आणि श्री. अमोल बालवडकर उपस्थित होते.

“प्रभाग क्रमांक ९ मधील विकासकामांना अधिक गती देऊन नागरिकांना प्रत्यक्ष दिलासा देणे तसेच दिलेली प्रत्येक आश्वासने पूर्णत्वास नेणे हा आमचा ठाम संकल्प आहे,” असे उमेदवारांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button