
पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २४ मधील भाजपचे उमेदवार गणेश बिडकर यांना दक्षिण भारतीय समाजाचा भक्कम आणि उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. आज सकाळी बिडकर यांनी रस्ता पेठ परिसरातील श्री अय्यप्पा मंदिरात दर्शन घेतले. केरळसह संपूर्ण दक्षिण भारतीय समाजासाठी विशेष धार्मिक महत्त्व असलेले हे मंदिर शहरातील सर्वात जुन्या दाक्षिणात्य मंदिरांपैकी एक आहे.
दर्शनानिमित्त मंदिर परिसरात मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या दक्षिण भारतीय समाजातील नागरिकांनी गणेश बिडकर यांचे जंगी स्वागत करत त्यांना जाहीर पाठिंबा दिला. यावेळी बिडकर यांनी मंदिरात आरती करून उपस्थित नागरिकांशी संवाद साधला.
दक्षिण भारतीय समाजातील नागरिकांनी सांगितले की, “गणेश बिडकर हे आमच्या कुटुंबातील सदस्यासारखे आहेत. कोणतेही काम सांगितले की ते तातडीने पूर्ण करतात. मिसेस बिडकरसुद्धा बहिणीसारख्या मदतीला धावून येतात. त्यामुळे आम्ही त्यांना आमच्या कुटुंबाचा भाग मानतो आणि त्यांना संपूर्ण पाठिंबा देतो.”
यावेळी श्री अय्यप्पा मंदिर समितीचे उपाध्यक्ष महेश पोडवाल म्हणाले,
“मंदिरासाठी किंवा समाजासाठी कधीही कोणती मागणी केली असता गणेश बिडकर यांनी ती नेहमी तत्काळ पूर्ण केली आहे. भविष्यातही ते आमच्या अपेक्षा पूर्ण करतील, याबाबत आम्हाला पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे प्रभागातील संपूर्ण दक्षिण भारतीय समाज त्यांच्या पाठीशी ठाम उभा आहे.”
मंदिर समितीचे सचिव शशांक नायर यांनीही बिडकर यांच्या कार्याची प्रशंसा करत सांगितले की,
“आरोग्याच्या समस्या असोत किंवा कोणतीही अडचण, अगदी अर्ध्या रात्रीही मदतीसाठी बोलावले तरी गणेश बिडकर त्वरित धावून येतात. अशा समर्पित जनसेवकासाठी आमचा समाज कायमच त्यांच्या पाठीशी उभा राहील.”
दक्षिण भारतीय समाजाकडून मिळालेला हा विश्वास आणि पाठिंबा प्रभाग क्रमांक २४ मधील निवडणूक प्रचारात गणेश बिडकर यांना मोठी ताकद देणारा ठरत आहे.