एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेची अंतरिम उत्तरसूची जाहीर; १६ जानेवारीपर्यंत ऑनलाईन आक्षेप नोंदविण्याची संधी

पुणे, दि. ९ : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत २८ डिसेंबर २०२५ रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (NMMS) परीक्षेची अंतरिम (संभाव्य) उत्तरसूची अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

ही उत्तरसूची https://www.mscepune.in/
तसेच https://2026.mscenmms.in/
या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे. परीक्षेतील प्रश्नपत्रिकेबाबत कोणत्याही प्रश्नांवर किंवा उत्तरांवर आक्षेप असल्यास, संबंधित आक्षेप १६ जानेवारी २०२६ पर्यंत फक्त ऑनलाईन पद्धतीने नोंदविता येणार आहेत.

शाळांसाठी ऑनलाईन निवेदन त्यांच्या लॉगिनमधील डॅशबोर्डवर उपलब्ध असून, पालक व विद्यार्थ्यांसाठी https://2026.mscenmms.in/
या संकेतस्थळावर ‘Interim Answer Key’ या शीर्षकाखाली स्वतंत्र लिंक देण्यात आली आहे. विहित मुदतीनंतर प्राप्त होणारे कोणतेही आक्षेप स्वीकारले जाणार नाहीत.

ऑनलाईन पद्धतीशिवाय टपाल, समक्ष भेट किंवा ई-मेलद्वारे पाठविण्यात आलेल्या त्रुटी किंवा आक्षेपांचा विचार केला जाणार नसल्याचे परीक्षा परिषदेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. विहित कालावधीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन आक्षेपांवर विषयतज्ज्ञांचे अभिप्राय घेऊन अंतिम उत्तरसूची प्रसिद्ध करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button