प्रभाग 22 काशेवाडी–डायस प्लॉटमध्ये काँग्रेस उमेदवारांची पदयात्रा; नागरिकांशी थेट संवाद— सत्तेत आल्यानंतर प्रभागातच जनता दरबार आयोजित करणार : अविनाश बागवे

पुणे, दि. —पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 22 काशेवाडी–डायस प्लॉट परिसरात अखिल भारतीय काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व मित्रपक्षांचे अधिकृत उमेदवार इंदिरा अविनाश बागवे, अविनाश बागवे, रफीक शेख आणि दिलशाद शेख यांनी आज पदयात्रेद्वारे नागरिकांशी थेट संवाद साधला.या पदयात्रेची सुरुवात पुना कॉलेज चुडामन तालीम येथून करण्यात आली. त्यानंतर मदीना हॉटेल, फकीर महामंद चाळ, एस.आर.ए. बिल्डिंग, उर्दू अध्यापक विद्यालय परिसरात पदयात्रा मार्गस्थ झाली. सायंकाळी रामोशी गेट ते भवानी पेठ, बनकर वाडा, बालाजी मंदिर ते गुरुकृपा सोसायटी असा प्रवास करत मोटार स्टँड येथे पदयात्रेचा समारोप झाला.यावेळी माजी नगरसेवक अविनाश बागवे यांनी सत्तेत आल्यानंतर स्थानिक नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवण्यासाठी प्रशासनाला सोबत घेऊन प्रभागातच नियमित ‘जनता दरबार’ आयोजित करण्याची घोषणा केली. त्यांच्या या घोषणेला उपस्थित नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.पदयात्रेदरम्यान उमेदवारांचे ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले. या उपक्रमात स्थानिक महिला व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. नागरिकांनी पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, आरोग्य व मूलभूत सुविधांबाबत आपल्या अपेक्षा उमेदवारांसमोर मांडल्या.या पदयात्रेत जुबेरबाबू शेख, चंद्रकांत चव्हाण, कविराज संघेलिया, मुन्नाभाई शेख, रोपभाई शेख, आरीफ शेख, विठ्ठल थोरात, दयानंद अडागळे, शफीक शेख, मारुती कसबे यांच्यासह अखिल भारतीय काँग्रेस व मित्रपक्षांचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button