एप्रिल-मेपर्यंत पीएमपीच्या ताफ्यात २,५०० नव्या गाड्या; रोज २० लाख प्रवाशांना मिळणार सेवा – खासदार मुरलीधर मोहोळ

पुणे :शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा मोठ्या प्रमाणात विस्तार करण्याची महत्त्वाकांक्षी योजना आखण्यात आली असून, एप्रिल-मे २०२६ पर्यंत पीएमपीच्या ताफ्यात सुमारे २,५०० नव्या गाड्या दाखल करण्यात येणार आहेत, अशी माहिती पुण्याचे खासदार आणि केंद्रीय सहकार व नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली. या विस्तारामुळे पीएमपीएमएलचा एकूण ताफा ४,००० गाड्यांपर्यंत पोहोचेल आणि दररोज १८ ते २० लाख प्रवाशांना सुरक्षित, सुलभ, जलद व पर्यावरणपूरक सेवा उपलब्ध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी पर्वती विधानसभा मतदारसंघात आयोजित पदयात्रा व रॅलीदरम्यान मोहोळ यांनी मतदारांशी संवाद साधला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, शहराची सार्वजनिक वाहतूक सक्षम करणे हा भाजपचा प्राधान्यक्रम असून मेट्रो आणि पीएमपी या दोन्ही सेवा समन्वयाने व कार्यक्षमतेने चालवण्याचे नियोजन आहे. यावेळी नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ या देखील पदयात्रेत सहभागी झाल्या होत्या.पीएमआरडीए हद्दीसह शहरातील बस मार्ग व फेऱ्यांचा सर्वंकष फेरआढावा घेतला जाणार असून, सध्या ३९४ मार्गांवर सुरू असलेल्या पीएमपी सेवेत किमान १०० नवीन मार्गांची भर घालण्यात येणार आहे. यामुळे उपनगरातील दुर्लक्षित भाग, झपाट्याने विकसित होणारे शहराबाहेरील परिसर तसेच औद्योगिक व आयटी हब्सपर्यंत सार्वजनिक वाहतूक अधिक प्रभावीपणे पोहोचणार असल्याचे मोहोळ यांनी सांगितले.पर्यावरणपूरक वाहतुकीला चालना देण्यासाठी १,००० ई-बस केंद्र सरकारने मंजूर केल्या असून, त्यांची खरेदी प्रक्रिया सुरू आहे. याशिवाय, २५ इलेक्ट्रिक डबल-डेकर बस भाडेतत्त्वावर सुरू करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. यासाठी निविदा प्रक्रिया सुरू असून, पुण्यात पुन्हा एकदा डबल-डेकर बस रस्त्यांवर धावणार आहेत.सप्टेंबर महिन्यात हिंजवडी, भोसरी, कोरेगाव पार्क आणि विमाननगर या मार्गांवर १० दिवसांची प्रायोगिक चाचणी घेण्यात आली होती. तज्ज्ञ समितीच्या सकारात्मक अहवालानंतर या बस सेवेला हिरवा कंदील देण्यात आला असल्याची माहितीही मोहोळ यांनी दिली. प्रमुख डबल-डेकर मार्गहिंजवडी फेज ३ (वर्तुळाकार)रामवाडी मेट्रो स्थानक – खराडीमगरपट्टा सिटी – कल्याणी नगर मेट्रोपुणे रेल्वे स्थानक – लोहगाव विमानतळदेहू – आळंदीचिंचवड – हिंजवडी नव्या गाड्यांसह पीएमपी सेवेचा विस्तार२०२६ पर्यंत २,५०० नव्या गाड्याएकूण ताफा : ४,००० बसरोज १८ ते २० लाख प्रवाशांना सेवा१०० नवीन बस मार्ग प्रस्तावित२५ इलेक्ट्रिक डबल-डेकर बसकेंद्राकडून १,००० ई-बसना मंजुरीपीएमपीची १८१ एकर जागा विकसित होणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button