
पुणे (दि. ८) – प्रभाग क्रमांक २५, शनिवारपेठ महात्मा फुले मंडई परिसरातील काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार निरंजन बाळासाहेब दाभेकर यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ना. पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. मोदी गणपती चौक येथे हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.या कार्यक्रमाला माजी आमदार मोहनदादा जोशी, माजी आमदार अनंतराव गाडगीळ, बाळासाहेब दाभेकर, काँग्रेस उमेदवार निरंजन बाळासाहेब दाभेकर, अनिल येनपुरे, तेजस्विनी दाभेकर, उमेश मिस्त्री, राजेंद्र पंडित, गौरव बोराडे, सुरेश कांबळे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना पृथ्वीराज चव्हाण यांनी सध्याच्या राज्यकर्त्यांवर टीका केली. राज्यात नवीन उद्योग आणण्यात अपयश आल्याने रोजगाराच्या संधी कमी होत असल्याचे त्यांनी सांगितले.दरम्यान, निरंजन दाभेकर यांच्या कार्याचा उल्लेख करताना पृथ्वीराज चव्हाण यांनी कोविड काळात त्यांनी केलेल्या सेवाभावी कार्याचे विशेष कौतुक केले. तसेच त्यांच्या सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानामुळे ते जनतेशी घट्ट नाते निर्माण करू शकले असल्याचे मत व्यक्त केले.