बोपोडीत ट्रॉमा केअर सेंटर सुरू करणार – सनी विनायक निम्हण

पुणे : अन्न, वस्त्र, निवारा याबरोबरच दर्जेदार शिक्षण आणि आरोग्य सुविधा या नागरिकांच्या मूलभूत गरजा आहेत. बोपोडी परिसरातील नागरिकांना उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी येत्या काळात ठोस पावले उचलली जातील. या भागातील महापालिकेचे दोन दवाखाने अधिक सक्षम केले जातील तसेच बोपोडीत अत्याधुनिक ट्रॉमा केअर सेंटर सुरू करण्यात येईल, असा विश्वास भारतीय जनता पक्ष–रिपब्लिकन पक्ष (आठवले) युतीचे औंध–बोपोडी प्रभाग क्रमांक ८ मधील उमेदवार चंद्रशेखर उर्फ सनी विनायक निम्हण यांनी व्यक्त केला.आज औंध–बोपोडी प्रभाग क्रमांक ८ मध्ये भाजप–रिपाइं (आठवले) युतीच्या उमेदवारांची पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत उमेदवार चंद्रशेखर उर्फ सनी विनायक निम्हण यांच्यासह परशुराम वाडेकर, भक्ति गायकवाड, सपना छाजेड सहभागी झाले होते. पदयात्रेदरम्यान त्यांनी बोपोडी परिसरातील नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी दोन्ही पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.मतदारांशी संवाद साधताना सनी निम्हण म्हणाले, बोपोडी परिसराचा सर्वांगीण व समतोल विकास करणे हे आमचे ध्येय आहे. सध्या बोपोडीतील नागरिकांना उपचारासाठी पिंपरी येथील वाय.सी.एम. हॉस्पिटल, खडकी कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल किंवा पुण्यातील ससून रुग्णालयात जावे लागते. बोपोडीतील शेवाळे दवाखाना कार्यरत असला तरी तेथे केवळ ओपीडी सुविधा उपलब्ध असून आवश्यक सोयींचा अभाव आहे.खेडेकर दवाखान्यात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून तेथे ट्रॉमा केअर सेंटर सुरू करण्यात येईल. तसेच संजय गांधी दवाखान्याची इमारत बांधून पूर्ण झाली असली तरी तो अद्याप सुरू झालेला नाही. हा दवाखाना लवकरात लवकर पूर्ण क्षमतेने सुरू करून बोपोडीच्या नागरिकांची आरोग्यसेवा अधिक बळकट केली जाईल, असे आश्वासन सनी निम्हण यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button