प्रभाग २४ मध्ये मनसेला खिंडार; विभाग अध्यक्षासह प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

पुणे :महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या कसबा गणपती – कमला नेहरू हॉस्पिटल – केईएम हॉस्पिटल परिसरातील प्रभाग क्रमांक २४ मध्ये भाजपाची ताकद आणखी वाढताना दिसत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (मनसे) येथे मोठा धक्का बसला असून, मनसेचे विभाग अध्यक्षांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी आमदार हेमंत रासने, भाजपचे पदाधिकारी सुनील कांबळे, निवडणूक प्रमुख व उमेदवार गणेश बिडकर तसेच इतर उमेदवार व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांमध्ये मनसे विभाग अध्यक्ष विशाल पवार यांच्यासह मनोज गुप्ता, यश मोर, तन्मय पवार, ऋषी सोलंकी, अथर्व टेंबे, साई राऊत, अथर्व उर्फ सोन्या वाघमारे, ऋषी सुकलेजा, राज मोरे, भगवान शिंदे, मंदार पाचोरे, मंदार माळवदकर, ओमकार भोसले यांचा समावेश आहे. या पदाधिकाऱ्यांसह अनेक कार्यकर्त्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे.हे सर्व पदाधिकारी प्रभागातील सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय होते. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे मनसेच्या संघटनात्मक रचनेला मोठी खिंडार पडली असून, भाजपसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे प्रभाग २४ मध्ये भाजपाचा विजयमार्ग अधिक सुकर झाल्याचे चित्र आहे.उमेदवार गणेश बिडकर यांनी गेल्या कार्यकाळात राबवलेल्या विकासकामांमुळे नागरिकांचा विश्वास भाजपवर अधिक दृढ झाला आहे. विकासाच्या मुद्द्यावरूनच विविध पक्षांतील पदाधिकारी भाजपकडे आकर्षित होत असून, प्रभाग २४ मध्ये भाजप अधिक मजबूत होत असल्याचे स्पष्ट होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button