उंड्री–महादेववाडीत शिवसेनेच्या कामाला नागरिकांची पावती; ‘शिवसेना हाच विकासाचा आधार’ असा ठाम निर्धार

उंड्री गावठाण, भितांडे वस्ती, कामठे वस्ती आणि होले वस्ती परिसरात शिवसेनेच्या प्रचार दौऱ्यादरम्यान नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळत आहे. प्रत्येक गल्ली, चौक आणि घराघरांतून शिवसेनेच्या कामाबद्दल समाधान आणि विश्वास व्यक्त होत असून, “काम तर दिसतंय नाना” अशा शब्दांत नागरिक आपुलकीनं भावना व्यक्त करत आहेत.

थेट संवादातून मिळणारी ही सकारात्मक प्रतिक्रिया आणि विश्वास कार्यकर्त्यांचा उत्साह अधिक वाढवत आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुण, व्यापारी आणि कामगार वर्ग यांचं म्हणणं एकच आहे — रस्त्यांची दुरुस्ती झाली, पाणीपुरवठ्याचा प्रश्न सुटला, ड्रेनेजची कामं मार्गी लागली आणि परिसरातील सुरक्षितता वाढली. “बोलायची गरज नाही, आम्ही रोज अनुभवतोय” असं नागरिक अभिमानानं सांगत असून, ही शिवसेनेच्या विकासकामांची खरी पावती असल्याचं चित्र दिसत आहे.

वाढता पाठिंबा ही जबाबदारी अधिक वाढवणारा असल्याचं मत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलं. पारदर्शक कारभार, लोकहिताचे निर्णय आणि प्रभागाचा सर्वांगीण विकास हाच शिवसेनेचा निर्धार असून, प्रभाग क्रमांक ४१ मधून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार प्रमोद नाना भानगिरे, स्वातीताई टकले, सारिका ताई पवार आणि मच्छिंद्र दगडे यांना मोठ्या मताधिक्यानं विजयी करण्याचा निर्धार नागरिक उघडपणे व्यक्त करत आहेत.

महादेववाडी–उंड्री परिसरात यंदा शिवसेनेचा भगवा फडकणार, हे चित्र प्रचार दौऱ्यातून स्पष्ट होत असून, यावेळी शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने प्रचार यात्रेत सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button