कोथरुडमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का; युवक आघाडी अध्यक्ष प्रमोद शिंदेंचा भाजपमध्ये प्रवेश

पुणे दि 8 : कोथरुडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कोथरुडचे युवक आघाडी अध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी बुधवारी रात्री भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शिंदे यांचे भाजपमध्ये स्वागत करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या प्रवेशावेळी भाजपचे सुशील मेंगडे, राजाभाऊ बराटे, महेश पवळे, संतोष बराटे उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासाभिमुख व कार्यक्षम नेतृत्वाने प्रेरित होऊन आपण भाजपमध्ये प्रवेश करत असल्याची भावना प्रमोद शिंदे यांनी व्यक्त केली. त्यांच्या प्रवेशामुळे कोथरुडमधील भाजप संघटन अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button