प्रभाग २५ मध्ये भाजपाचे ‘मायक्रो मॅनेजमेंट’; मताधिक्याने विजयासाठी संघटना सज्ज

प्रभाग २५ – शनिवार पेठ, महात्मा फुले मंडई या प्रभागातून भाजपाचे अधिकृत उमेदवार राघवेंद्र बाप्पू मानकर, स्वरदा बापट, कुणाल टिळक आणि स्वप्नाली पंडित निवडणूक रिंगणात आहेत. विकासकामे, नागरिकांशी थेट संवाद आणि सूक्ष्म पातळीवरील नियोजन या त्रिसूत्रीवर भाजपाचा प्रचार सुरू आहे.

या संदर्भात बोलताना भाजपाचे कसबा विधानसभा अध्यक्ष अमित कंक म्हणाले, “आमदार हेमंतभाऊ रासने यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही निवडणूक लढवीत आहोत. नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून भाजपा प्रत्येक निवडणूक गांभीर्याने लढते. ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या मेहनतीतून उभी राहिलेली संघटनात्मक फळी, निवडणुकीचे प्रभावी मायक्रो मॅनेजमेंट आणि विकासकामे नागरिकांपर्यंत पोहोचवणारे कार्यकर्ते यांच्या बळावर प्रभाग २५ मध्ये मोठा विजय मिळवण्याचा आमचा निर्धार आहे.”

या विजयासाठी प्रभाग २५ चे पदाधिकारी मनोज खत्री, किरण जगदाळे, निलेश कदम, संतोष फडतरे, मनीष जाधव, प्रभाग अध्यक्ष सुनील रसाळ, प्रणव गंजीवाले, अनंत कुंटे, धनंजय डिंबळे, अजित सुकादने, योगिता गोगावले, रुपाली कदम, दिलीप पवार, सोहम भोसले, आदेश पारवे, अमित सोनवणे, अनिल पवार, बिपीन बोरावके, श्रेयस लेले यांच्यासह सर्व हजारी भाग प्रमुख आणि कार्यकर्ते अहोरात्र परिश्रम घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button