पुणे–पिंपरी चिंचवडच्या ढासळलेल्या व्यवस्थेवर अजितदादांचा ‘अलार्म’; महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची नवी रणनीती

पुणे, दि. ७ : पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकांमधील ढासळलेल्या नागरी व्यवस्थेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र चिंता व्यक्त करत आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी “अलार्म” या संकल्पनेवर आधारित व्यापक प्रचार मोहीम जाहीर केली आहे. नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी हेच या मोहिमेचे केंद्रबिंदू असून, ही केवळ गैरसोयींची नोंद नसून महापालिका प्रशासन अपयशी ठरत असल्याचा थेट इशारा असल्याचे या अभियानातून स्पष्ट करण्यात आले आहे.गेल्या सहा महिन्यांत पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये करण्यात आलेल्या व्यापक ग्राउंड सर्वेक्षणां आणि थेट जनसंवादातून प्राप्त तक्रारींवर ही मोहीम आधारित आहे. पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागणे, दुर्गंधीयुक्त कचऱ्याचे ढीग, वाढता वायू प्रदूषण निर्देशांक (AQI), तसेच वाहतूक कोंडीमुळे ठप्प झालेले शहरजीवन – हे सर्व आज शहरात वाजणारे गंभीर ‘अलार्म’ असल्याचे अजित पवार यांनी अधोरेखित केले.“सध्याचे प्रशासन नागरिकांचे मूलभूत प्रश्न सोडवण्यात सपशेल अपयशी ठरले आहे. आमचा संदेश स्पष्ट आहे – अलार्म वाजतोय! आता पुणेकर आणि पिंपरी-चिंचवडकरांनीच पुढाकार घेऊन आपल्या शहराची अवस्था सुधारण्यासाठी हा अलार्म बंद करायचा आहे,” असे अजित पवार यांनी या मोहिमेच्या माध्यमातून स्पष्ट केले.या मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे उमेदवार स्वतः समस्याग्रस्त भागात जाऊन नागरिकांशी संवाद साधत आहेत. पाण्याच्या टँकरच्या रांगा, रस्त्यांवरील खड्डे, कचऱ्याचे ढिग अशा ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित राहून उमेदवार व्हिडिओ तयार करत असून, अशा प्रकारचे हे पहिलेच समस्या-केंद्रित डिजिटल कॅम्पेन ठरत आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचा “शिव-शाहू-फुले-आंबेडकर” विचारधारेचा पाया हा घोषणांपेक्षा कृतीवर आधारित असल्याचे या मोहिमेत ठळकपणे मांडण्यात आले आहे. “कामाचा माणूस” अशी ओळख असलेल्या अजित पवार यांची कार्यपद्धती, शिस्तबद्ध प्रशासन आणि विकासाभिमुख निर्णय हेच या अभियानाचे अधिष्ठान आहे. ‘एक अलार्म, पाच काम’ – मोहिमेची मुख्य सूत्रेपाणी: २४x७ स्वच्छ पाणी पुरवठ्याची हमीरस्ते व वाहतूक: खड्डेमुक्त, दर्जेदार रस्ते व गतिमान वाहतूक व्यवस्थास्वच्छता: वेळेवर कचरा संकलन व स्वच्छ शहर अभियानसार्वजनिक जागा व प्रदूषण नियंत्रण: क्रीडांगणे, उद्याने व प्रदूषणमुक्त वातावरणआरोग्य: प्रत्येक प्रभागात सुसज्ज व सुलभ आरोग्य सुविधापुणे व पिंपरी-चिंचवडकरांनी वर्षानुवर्षे उच्च जीवनमान निर्माण केले आहे. मात्र सध्याच्या अकार्यक्षम व्यवस्थेमुळे ते ढासळत असल्याची जाणीव करून देत, स्थानिक स्वराज्य संस्थांना पुन्हा कार्यक्षम करण्यासाठी शिस्तबद्ध “अजित पवार मॉडेल” आवश्यक असल्याचे या मोहिमेतून स्पष्ट करण्यात येत आहे.“दादांनी सांगितलं म्हणजे काम होणारच” हा केवळ नारा नसून गेल्या तीन दशकांतील जनतेचा अनुभव असल्याचा विश्वास व्यक्त करत, “घड्याळावर बटन दाबा आणि काम पुन्हा सुरू करा” असे आवाहन या मोहिमेतून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button