उद्यानात वॉकिंग ट्रॅक व व्यायाम साहित्य उपलब्ध करणार – राघवेंद्र बाप्पु मानकर

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २५ – शनिवार पेठ, महात्मा फुले मंडई येथील भाजपाचे अधिकृत उमेदवार राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी सकाळच्या वेळेत मॉर्निंग वॉक व व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांशी थेट संवाद साधला. यावेळी प्रभागातील ज्येष्ठ नागरिक व व्यायामप्रेमी नागरिकांसाठी स्वतंत्र वॉकिंग ट्रॅक, व्यायामासाठी आवश्यक साहित्य तसेच प्रशिक्षक उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

या उपक्रमाअंतर्गत भाजपाचे अधिकृत उमेदवार राघवेंद्र बाप्पु मानकर, स्वरदा बापट, कुणाल टिळक आणि स्वप्नाली पंडित यांनी वर्तक बाग, छत्रपती संभाजी महाराज उद्यान, सारस बाग, महाराणा प्रताप उद्यान व साठे उद्यान येथे सकाळी व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या व सूचना जाणून घेतल्या.

नागरिकांशी चर्चा करताना राघवेंद्र बाप्पु मानकर म्हणाले, “आरोग्य चांगले राहण्यासाठी नियमित व्यायाम आवश्यक आहे. प्रभागातील ज्येष्ठ नागरिक व व्यायामप्रेमींसाठी स्वतंत्र वॉकिंग ट्रॅक उभारण्यात येईल. तसेच व्यायामासाठी आवश्यक साहित्य व मार्गदर्शनासाठी प्रशिक्षक उपलब्ध करून देण्यात येतील.”

यावेळी माजी नगरसेवक राजेश येनपुरे, गायत्री खडके, मतदारसंघ अध्यक्ष अमित कंक, बिपिन बोरावके, मनीष जाधव, किरण जगदाळे, कुणाल आहेर, धनंजय डिंबळे तसेच भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button