सत्तेपेक्षा सेवा मोठी; २५ वर्षे ‘सामान्य कार्यकर्ता’ हीच ओळख जपणारे गणेश बिडकर

पुणे दि 7 :सक्रिय राजकारणात पदार्पण करून गणेश बिडकर यांनी २५ वर्षांचा विश्वासाचा आणि सेवाभावाचा प्रवास पूर्ण केला आहे. महापालिकेत नगरसेवक ते सभागृहनेता अशी विविध महत्त्वाची पदे भूषवूनही त्यांनी कायम सामान्य कार्यकर्ता हीच ओळख जपली. सत्तेपेक्षा सेवा महत्त्वाची मानणाऱ्या या नेतृत्वामुळेच आजही ते नागरिकांचे ‘आपले माणूस’ म्हणून ओळखले जातात.प्रभागातील कोणतेही प्रश्न असोत, नागरिकांनी हाक दिली की ते घरातील सदस्याप्रमाणे तत्काळ धावून जातात. वडिलांकडून जपलेली माणसांची नाती त्यांनी आजही तितक्याच आपुलकीने जपली आहेत. त्यांच्या साधेपणामुळे आणि सततच्या उपस्थितीमुळे प्रभागात त्यांना नागरिकांचा भरघोस पाठिंबा मिळत आहे.प्रभाग क्रमांक २४ (कसबा पेठ परिसर) मधून भाजपाचे अधिकृत उमेदवार असलेले गणेश बिडकर २००२ साली प्रथमच नगरसेवक म्हणून निवडून आले. दुसऱ्या टर्मनंतर २०११-१२ मध्ये त्यांना स्थायी समिती अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली. महापालिकेत सत्ता नसतानाही त्यांच्या मुत्सद्दीपणामुळे प्रभागातील विकासकामांना गती मिळाली.या कालावधीत श्री नागेश्वर आणि त्रिशुंड गणपती मंदिराचा जीर्णोद्धार, कमला नेहरू रुग्णालयातील कामे, तसेच विविध नागरी सुविधा प्रकल्प मार्गी लागले. प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दुवा म्हणून त्यांनी सातत्याने निधी मिळवून प्रभागातील प्रश्न सोडवले.मेट्रो आणि ‘जायका’ प्रकल्पांना मंजुरी मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला. २०२० ते २०२२ या कालावधीत सभागृहनेता म्हणून त्यांनी चोवीस तास पाणीपुरवठा, नदी पुनरुज्जीवन, कचरा व्यवस्थापन आणि मेट्रोसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना गती दिली. समाजाशी असलेली बांधिलकी, विकासाचा ध्यास आणि पक्षाशी असलेली एकनिष्ठा यामुळेच पक्षाने त्यांच्यावर तिसऱ्या टर्ममध्ये गटनेतेपदाची जबाबदारी सोपवली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button