
पुणे, दि. 7 : पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २२ मधील अखिल भारतीय काँग्रेस पक्ष, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व मित्रपक्षांचे अधिकृत उमेदवार इंदिरा अविनाश बागवे, अविनाश रमेश बागवे, रफिक शेख व दिलशाद शेख यांनी आज प्रचाराची सुरुवात सर्वधर्मीय ऐक्याचा संदेश देत काशेवाडी येथील हजरत चमणशाह दर्ग्यात चादर अर्पण करून केली.या वेळी सर्वधर्मीय समाजबांधवांनी एकत्र येत सामूहिक दर्शन घेतले. मुस्लिम समाजातील महिलांनी उमेदवारांचे उत्स्फूर्त स्वागत करत त्यांना पाठिंबा दर्शविला.यानंतर काशेवाडी परिसरात पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेदरम्यान हातगाडी व्यावसायिक, भाजीपाला विक्रेते तसेच पथारी व्यावसायिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. नागरिकांशी मुक्त संवाद साधत विकास व मूलभूत प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.या पदयात्रेत मुस्लिम महिला व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. काँग्रेस पक्षाच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. अनेक ठिकाणी जेष्ठ नागरिक घराबाहेर येऊन उमेदवारांना मनोभावे आशीर्वाद देत होते.या पदयात्रेत माजी राज्यमंत्री रमेशदादा बागवे, विठ्ठल थोरात, बाकेर बागवे, दयानंद अडागळे, हुसेन शेख, राजू मोरे, मोहन माने, दिलीप कांबळे, हुसेन हमजू शेख, रफीक पठाण, दीपक गायकवाड, जाहिदा शेख, सुनील शेंडगे, मारुती कसबे, बापू कसबे यांच्यासह परिसरातील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.