सीडीएस २०२६ तयारीसाठी नाशिक येथे तज्ज्ञ शिक्षकांची तात्पुरती नियुक्ती

पुणे, दि.7 : यूपीएससीमार्फत घेण्यात येणाऱ्या कंम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झामिनेशन (सीडीएस)–२०२६ च्या तयारीसाठी नाशिक रोड येथील छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात तज्ज्ञ शिक्षकांची तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्यात येणार आहे.

इंग्रजी, गणित, सामान्य ज्ञान (भूगोल, इतिहास, भारतीय राजकारण) तसेच सामान्य विज्ञान (अर्थशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र) या विषयांसाठी पात्र शिक्षकांची निवड केली जाणार असून, त्यांना ३०० रुपये प्रती तासिका मानधन देण्यात येईल.

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे संबंधित विषयातील पदवी किंवा पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे. तसेच स्पर्धा परीक्षांच्या अध्यापनाचा किमान दोन वर्षांचा अनुभव असणे बंधनकारक आहे.

पात्र उमेदवारांनी शुक्रवार, दिनांक ९ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता सर्व आवश्यक कागदपत्रांसह छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, विभागीय आयुक्त कार्यालय परिसर, नाशिक रोड, नाशिक येथे मुलाखतीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रभारी अधिकारी ले. कर्नल विलास शंकर सोनवणे (नि.) यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button