
पुणे दि. 7 : कोथरूड विधानसभा परिसरातील प्रभाग क्रमांक ११ (ब) मध्ये आता राजकीय बदलाची लाट स्पष्टपणे जाणवू लागली आहे. आम आदमी पार्टीकडून निर्भीड पत्रकार आणि सामाजिक प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणाऱ्या सौ. जयश्री डिंबळे यांनी निवडणूक रिंगणात दमदार एन्ट्री घेतली असून, त्यांच्या उमेदवारीमुळे राजकीय समीकरणे बदलत असल्याचे चित्र दिसत आहे.
सामान्य नागरिकांचे प्रश्न, महिलांची सुरक्षितता, मूलभूत नागरी सुविधा आणि भ्रष्टाचारमुक्त कारभार यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या जयश्री डिंबळे यांना मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
“काम बोलणार, आश्वासन नाही” या ठाम भूमिकेसह त्या घरोघरी जाऊन मतदारांशी थेट संवाद साधत आहेत.
कोथरूड परिसरातील शिक्षण, आरोग्य सुविधा, रोजगारहमी, पाणीपुरवठा, रस्त्यांची अवस्था, स्वच्छता आणि वाहतूक या ज्वलंत प्रश्नांवर ठोस व वेळबद्ध उपाययोजना करण्याचा त्यांचा स्पष्ट अजेंडा आहे. तसेच महिलांसाठी सुरक्षित, सक्षम आणि सन्मानजनक वातावरण निर्माण करण्यावर त्यांचा विशेष भर आहे.
आम आदमी पार्टीचे झाडू हे निवडणूक चिन्ह स्वच्छ, पारदर्शक आणि लोकाभिमुख कारभाराचे प्रतीक असल्याचे सांगत
“झाडूलाच मतदान म्हणजे योग्य विकासाला मतदान” असा स्पष्ट संदेश त्या मतदारांना देत आहेत.
प्रभागाच्या उज्ज्वल भविष्यासाठी मतदारांनी आपले मौल्यवान मत देऊन भरघोस मतांनी जयश्री डिंबळे यांना विजयी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.