प्रभाग २५ मध्ये राघवेंद्र बाप्पु मानकर यांचा घरोघरी संपर्क दौरा; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे : प्रभाग क्रमांक २५ (शनिवार पेठ–महात्मा फुले मंडई) येथील भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी शनिवारी प्रभागातील विविध भागांमध्ये घरोघरी भेटी देत नागरिकांशी थेट संवाद साधला. या संपर्क दौऱ्यादरम्यान अनेक ठिकाणी नागरिकांनी औक्षण करून त्यांचे स्वागत करत आशीर्वाद दिले.

हा संवाद दौरा शनिवार पेठेतील आपटे घाट, महालिरकर टेकडी, उभा शनिवार, तांबे बोळ, घोडके आळी, वीर मारुती चौक, कडबे आळी, हसबनीस बखळ, काळभे वस्ती, मेहुनपुरा तसेच शनिवार पेठेतील इतर भागांमध्ये पार पडला. यावेळी नागरिकांनी ‘२४ तास जनसेवा’ कार्यालय आणि ‘मिशन स्वच्छ प्रभाग २५’ या उपक्रमांमधून झालेल्या कामांचे कौतुक करत, भविष्यात अधिक विकासकामांची अपेक्षा व्यक्त केली.

या प्रचार दौऱ्यात कसबा मतदारसंघ सरचिटणीस निलेश कदम, प्रभाग अध्यक्ष सुनील रसाळ, धनंजय डेंबळे, उमेश नवरे, अनंत कुंटे, राम दहाड, भूषण बोकील, अतुल मुरकुटे, अमित मुनोत, सर्वेश पवार, मनीष जाधव, ओंकार डिंबळे, कौस्तुभ गोखले, महेश काटदरे, यश थोपटे, कौस्तुभ गाडे आणि संतोष नामजोशी यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत भारतीय जनता पक्षालाच विजयी करण्याचे आश्वासन दिले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button