प्रभाग 22 हरकानगरमध्ये काँग्रेस–शिवसेना (उबाठा) उमेदवारांचे पदयात्रेद्वारे जल्लोषात स्वागत

पुणे, दि.6: पुणे महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान प्रभाग क्रमांक 22 मधील हरकानगर वसाहतीत अखिल भारतीय काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व मित्रपक्षांचे अधिकृत उमेदवार इंदिरा अविनाश बागवे, अविनाश बागवे, रफीक शेख व दिलशाद शेख यांचे नागरिकांनी पुष्पहार अर्पण करत उत्साहात स्वागत केले.

या प्रचार पदयात्रेची सुरुवात गोगादेव मंदिरात दर्शन घेऊन करण्यात आली. पदयात्रेदरम्यान हरकानगर परिसरात मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या. उमेदवारांनी घरोघरी जाऊन मतदारांशी थेट संवाद साधत त्यांच्या स्थानिक समस्या जाणून घेतल्या.

यावेळी उमेदवार इंदिरा अविनाश बागवे यांनी महिलांना बचत गट तसेच मुक्ता फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी करण्याचे आश्वासन दिले. महिलांशी प्रत्यक्ष संवाद साधताना त्यांनी शिक्षण, रोजगार, आरोग्य व पायाभूत सुविधांशी संबंधित अनेक समस्या ऐकून घेतल्या व त्या यशस्वीरीत्या सोडवण्याचा विश्वास दिला.

आज झालेल्या पदयात्रेत जुबेरबाबू शेख, चंद्रकांत चव्हाण, कविराज संघेलिया, वीरेंद्र घोसरे, मनीष तांदरे, दयानंद अडागळे, यासर बागवे, मधुकर चांदणे, मारुती कसबे, शफीक शेख, दीपक गायकवाड, फारुक बागवान, जावेद शेख यांच्यासह अखिल भारतीय काँग्रेस पक्ष व मित्रपक्षांचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button