पुणे महानगरपालिकेतील सर्वाधिक उच्चशिक्षित चेहरा : सनी विनायक निम्हण

पुणे दि. 5:  पुणे महानगरपालिकेतील सर्वाधिक उच्चशिक्षित लोकप्रतिनिधी म्हणून सनी विनायक निम्हण यांची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे. परदेशात उच्च शिक्षण घेऊनही देशात परत येत उद्योग, व्यवसाय आणि समाजकारण यांचा समतोल साधणारे सनी निम्हण हे आज पुण्यातील एक आश्वासक तरुण नेतृत्व म्हणून उदयास आले आहेत. औंध–बोपोडी परिसरातील नागरिकांमध्ये त्यांच्या कार्याबद्दल सकारात्मक भावना असून, त्यांना मोठ्या प्रमाणात जनसमर्थन लाभत असल्याचे चित्र दिसून येत आहे. यंदा ते प्रभाग क्रमांक ८ – औंध बोपोडी येथून भारतीय जनता पक्षाच्या वतीने पुणे महानगरपालिका निवडणूक लढवत आहेत.

दिवंगत आमदार विनायक निम्हण यांचा राजकीय व सामाजिक वारसा लाभलेले सनी निम्हण हे सुरुवातीपासूनच अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. अभ्यास, क्रीडा आणि समाजकारण या प्रत्येक क्षेत्रात त्यांनी स्वतःचा ठसा उमटवला आहे. त्यांचे शालेय शिक्षण एस.एस.पी.एम.एस. आणि मॉडर्न इंग्लिश मिडियम स्कूल येथे झाले. एमआयटी मधून बी.ई. (सिव्हिल इंजिनिअरिंग) पूर्ण केल्यानंतर त्यांनी ‘कन्स्ट्रक्शन अँड प्रॉपर्टी मॅनेजमेंट’ या विषयात एम.एस. पदवीसाठी ऑस्ट्रेलियातील जागतिक कीर्तीच्या मेलबर्न विद्यापीठात प्रवेश मिळवला. विशेष म्हणजे हा प्रवेश त्यांना स्कॉलरशिपसह मिळाला होता.

वडील आमदार असूनही शिक्षणाचे मोल आणि कष्टाची जाणीव कायम राहावी, या उद्देशाने सनी निम्हण यांनी परदेशी शिक्षणासाठी एज्युकेशन लोन घेतले. शिक्षण पूर्ण करून भारतात परतल्यानंतर त्यांनी हे कर्ज पूर्णपणे फेडून जबाबदारीची प्रगल्भता दाखवून दिली. ऑस्ट्रेलियात वास्तव्यास असताना दैनंदिन खर्च भागवण्यासाठी ते दररोज चार तास काम करत होते. दोन वर्षांच्या काळात शिक्षण, काम आणि प्रत्यक्ष अनुभव यांचा समतोल साधत त्यांनी स्वतःला अधिक सक्षम केले.

उच्च शिक्षणानंतर भारतात परतलेल्या सनी निम्हण यांनी औंध परिसराचे नगरसेवक म्हणून प्रभावी आणि परिणामकारक कामगिरी केली आहे. शहरी विकास, युवा सक्षमीकरण, महिला उत्थान, उद्योजकता, क्रीडा विकास आणि स्वच्छ शहर संकल्पना यावर त्यांचा विशेष भर आहे. सिव्हिल इंजिनिअरिंग आणि प्रॉपर्टी मॅनेजमेंटमधील आंतरराष्ट्रीय शिक्षणाचा उपयोग करून त्यांनी विकासाभिमुख योजना यशस्वीपणे राबवल्या आहेत.

खुले प्रशासन, संवेदनशील नेतृत्व आणि परिणामकेंद्रित कार्यपद्धती हीच त्यांची ओळख ठरली आहे. ‘विनायकी शिष्यवृत्ती’च्या माध्यमातून त्यांनी सामाजिक भान जपले असून ‘सनीज वर्ल्ड’मधून एक यशस्वी उद्योजक म्हणूनही ते ओळखले जातात. तसेच ‘महा आरोग्य शिबिरा’च्या माध्यमातून आतापर्यंत दीड लाखांहून अधिक नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे महत्त्वपूर्ण कार्य सनी निम्हण यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button