प्रभाग २५ मध्ये भाजप उमेदवारांच्या पदयात्रेला उदंड प्रतिसाद; राघवेंद्र बाप्पू मानकरांसह सर्व उमेदवारांना नागरिकांचा भक्कम पाठिंबा


पुणे दि. 5: प्रभाग क्रमांक २५ मधील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ रविवारी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पदयात्रा काढण्यात आली. आमदार हेमंत रासने यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या पदयात्रेत शेकडो नागरिकांनी सहभाग घेत उमेदवारांचे जोरदार स्वागत केले. राघवेंद्र बाप्पू मानकर यांच्यासह भाजपच्या सर्व उमेदवारांना मतदारांनी उत्स्फूर्त पाठिंबा दर्शवला.

‘प्रभाग २५ मधील पुणेकरांचा निर्धार, निवडून येणार भाजपचेच उमेदवार’ आणि ‘पुण्याची शान, भाजपचा मान; प्रभाग २५ चा वाढवू सन्मान’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
कुमठेकर रस्ता, चित्रशाळा चौक, फडतरे चौक येथे पदयात्रा पोहोचताच कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला. पेरुगेट, पावन मारुती आणि लिमयेवाडी परिसरात नागरिकांनी घराच्या बाल्कनीतून उमेदवारांवर पुष्पवृष्टी करत औक्षण करून स्वागत केले. नवजवान चौक, नागनाथपार, गायआळी आणि निंबाळकर तालीम परिसरात उमेदवारांनी मतदारांशी थेट संवाद साधत विजयाचा विश्वास व्यक्त केला.

खजिना विहीर, स्वामी समर्थ मंदिर आणि माडीवाले कॉलनीमार्गे बाजीराव रस्त्यावरील भिकारदास मारुती मंदिर येथे दर्शन घेऊन विजयाचा संकल्प करण्यात आला. महाराणा प्रताप उद्यान येथे पदयात्रेचा समारोप झाला.
या वेळी चारही भाजप उमेदवारांनी तत्पर लोकसेवेच्या माध्यमातून प्रभागाच्या सर्वांगीण विकासाची ग्वाही दिली. अनेक गणेश मंडळांनी देखील उमेदवारांचे स्वागत केले.

या पदयात्रेत माजी नगरसेवक दिलीप काळोखे, राजेश येनपुरे, माजी नगरसेविका गायत्री खडके, उदय लेले, मंडल अध्यक्ष अमित कंक, शहर चिटणीस मनोज खत्री, मंडल सरचिटणीस निलेश कदम, किरण जगदाळे, संतोष फडतरे, शहर पदाधिकारी प्रणव गंजीवाले, महिला आघाडीच्या मोहना गद्रे, रुपाली कदम, सुरेखाताई पाषाणकर, उज्वलाताई पावटेकर, प्रभाग अध्यक्ष सुनील रसाळ, युवा मोर्चाचे श्रेयस लेले तसेच भाजपचे बुथप्रमुख, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button