प्रभाग २६ मधील काँग्रेस उमेदवारांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे दि. 5: पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २६ समता भूमी–घोरपडे पेठ येथे अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारांनी आज प्रचाराची दमदार सुरुवात केली. रवी पाटोळे, अ‍ॅड. भावना बोराटे, संजीवनी बालगुडे आणि सईद सय्यद यांनी समता भूमी येथून प्रचाराला प्रारंभ केला.

प्रचारादरम्यान ठिकठिकाणी छोटे व्यावसायिक, महिला आणि युवकांनी उमेदवारांचे उत्स्फूर्त स्वागत केले. विशेषतः रिक्षावाले, पथारी व्यवसाय करणारे नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी बोलताना उमेदवार रवी पाटोळे यांनी रिक्षाचालक, पथारी व्यावसायिक तसेच सामान्य नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्याचे आश्वासन दिले.

तसेच या वसाहतीतील पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, आरोग्य व मूलभूत सुविधांशी संबंधित विविध प्रश्न अत्यंत काळजीपूर्वक आणि तातडीने सोडवण्यात येतील, असे आश्वासन काँग्रेसच्या उमेदवारांनी दिले.

समता भूमी प्रभागातील नागरिक व महिलांनी काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांचे अत्यंत उत्स्फूर्त स्वागत केले. ठिकठिकाणी काँग्रेस पक्षाच्या घोषणा देत कार्यकर्त्यांनी प्रचारात जोश निर्माण केला होता. यावेळी उपस्थित नागरिकांनी काँग्रेस पक्षाच्या सर्वच उमेदवारांना विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button