प्रभाग २५ मध्ये भाजपाची भव्य पदयात्रा; आमदार हेमंत रासने यांच्या उपस्थितीत मानकर–बापट–टिळक–पंडित यांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे : प्रभाग क्रमांक २५ मधील भाजपाचे अधिकृत उमेदवार राघवेंद्र बाप्पु मानकर, स्वरदा बापट, कुणाल टिळक आणि स्वप्नाली पंडित यांच्या प्रचारार्थ आज एक भव्य आणि उत्साहपूर्ण पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या पदयात्रेला आमदार हेमंतजी रासने यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

पदयात्रेची सुरुवात पंतांचा गोट येथून झाली. पुढे ही पदयात्रा ज्ञानप्रबोधिनी, सोनवणे चाळ, राजाराम मंडळ खालकर तालीम, कुमठेकर रोड, चित्रशाळा चौक, सदाशिवपेठ हौद, फडतरे चौक, गाडगीळ रस्ता, नवजवान चौक, नागनाथपार, गायआळी, निंबाळकर तालीम, पेरुगेट, पावन मारुती, लिमयेवाडी, शेडगे आळी, टिळक रोड, खजिना महाल, चिमण्या गणपती, देशमुखवाडी आदी प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत महाराणा प्रताप उद्यान येथे पदयात्रेचा समारोप झाला.

या पदयात्रेदरम्यान ठिकठिकाणी नागरिकांनी उमेदवारांचे स्वागत करत त्यांना शुभेच्छा दिल्या. भाजपाच्या विकासाभिमुख धोरणांवर विश्वास व्यक्त करत स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
आमदार हेमंत रासने यांनी यावेळी बोलताना, “प्रभाग २५ च्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम आणि कार्यक्षम उमेदवारांची गरज आहे. भाजपाचे उमेदवार हे जनतेच्या अपेक्षांवर खरे उतरतील,” असा विश्वास व्यक्त केला.

भव्य पदयात्रेमुळे प्रभाग २५ मध्ये भाजपाच्या प्रचाराला नवसंजीवनी मिळाली असून निवडणूक वातावरण अधिकच तापले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button