ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या पाद्यपूजनाने भाजपच्या निवडणूक कचेरीचे भावनिक उद्घाटन

पुणे : भाजपच्या प्रभाग क्रमांक २५ – शनिवार पेठ, महात्मा फुले मंडई येथील अधिकृत उमेदवारांच्या प्रचारासाठी सुरू करण्यात आलेल्या निवडणूक कचेरीचे उद्घाटन एका अनोख्या, भावनिक आणि प्रेरणादायी सोहळ्यात पार पडले. पक्षासाठी आयुष्य वेचलेल्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या पाद्यपूजनाने या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.

निवडणूक कचेरीच्या उद्घाटनप्रसंगी पक्षाच्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचलणाऱ्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या त्यागाला, निष्ठेला आणि निस्वार्थ सेवेला वंदन करण्यात आले. या वेळी प्रभाग २५ मधील ज्येष्ठ नगरसेविका मीराताई पावगी, ज्योत्स्नाताई सरदेशपांडे, रमेशजी परचुरे आणि किरणजी सरदेशपांडे यांच्या हस्ते ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे पाद्यपूजन करून सन्मान करण्यात आला.

यावेळी बोलताना भाजपचे अधिकृत उमेदवार राघवेंद्र बाप्पु मानकर म्हणाले, “निवडणूक ही केवळ राजकीय लढाई नसून संघटनेचा आत्मा असलेल्या कार्यकर्त्यांचा सन्मान जपण्याची जबाबदारी उमेदवारांची असते. पक्षाच्या यशामागे लाखो ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे अनेक वर्षांचे कष्ट, त्याग आणि समर्पण आहे. त्याच भावनेतून हा सोहळा आयोजित करण्यात आला.”

या हृद्य आणि प्रेरणादायी सोहळ्यास कसब्याचे आमदार हेमंतभाऊ रासने यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला भाजपचे उमेदवार राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्यासह स्वरदा बापट, कुणाल टिळक, स्वप्नाली पंडित, माजी नगरसेवक दिलीप काळोखे, राजेश येनपुरे, गायत्री खडके, उदय लेले, अमित कंक, मनोज खत्री, निलेश कदम, किरण जगदाळे, संतोष फडतरे, प्रणव गंजीवाले, मोहना गद्रे, रुपाली कदम, सुनील रसाळ, श्रेयस लेले आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान हेच भाजपच्या संघटनात्मक ताकदीचे प्रतीक असून या निवडणूक प्रचाराची सुरुवात कार्यकर्त्यांच्या श्रद्धेने आणि मूल्यांनी झाली, अशी भावना उपस्थितांमध्ये दिसून आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button