गणेश बिडकरांचा ‘एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह’ पॅटर्न ठरतोय नागरिकांसाठी दिलासादायक; प्रभाग २४ मध्ये हजारो समस्या मार्गी

पुणे :
गेली तीन वर्षे पुणे महानगरपालिकेवर प्रशासकीय राजवट असल्याने लोकनियुक्त नगरसेवक नसल्याचा थेट फटका नागरिकांना बसत आहे. छोट्या-मोठ्या नागरी समस्यांसाठी महापालिकेच्या कार्यालयात वारंवार हेलपाटे घालावे लागत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढली होती. ही परिस्थिती लक्षात घेऊन महापालिकेचे माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांनी सुरू केलेला ‘एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह’ हा उपक्रम प्रभाग क्रमांक २४ मधील नागरिकांसाठी मोठा दिलासा ठरत आहे.

महापालिका अस्तित्वात नसतानाही सक्षम आणि कार्यक्षम यंत्रणा उभी करून गणेश बिडकर यांनी हा उपक्रम प्रभावीपणे राबवला आहे. पाणीपुरवठा, मलनिःसारण, रस्ते, बांधकाम परवाने, देखभाल-दुरुस्ती, पथ विभाग तसेच सांस्कृतिक विभागाशी संबंधित तक्रारींसाठी नागरिकांना पूर्वी थेट शासकीय कार्यालयांत फेऱ्या माराव्या लागत होत्या. मात्र आता नागरिकांचा एक फोन येताच तक्रारींची दखल घेतली जाते आणि थेट जागेवर जाऊन समस्या सोडवण्याची कार्यपद्धती अमलात आणली जात आहे.

या उपक्रमामुळे प्रशासन काळात निर्माण झालेली लोकप्रतिनिधींची पोकळी काही अंशी भरून निघत असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे. तक्रारी प्रलंबित न ठेवता तातडीने मार्ग काढण्यावर भर देण्यात येत असून, बिडकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत टीम सातत्याने नागरिकांच्या सेवेत कार्यरत आहे.

याबाबत बोलताना गणेश बिडकर म्हणाले,
“नगरसेवक हा प्रशासन आणि नागरिकांमधील महत्त्वाचा दुवा असतो. नागरिकांना जलद, पारदर्शक आणि सुलभ सेवा मिळावी, याच उद्देशाने ‘एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह’ हा उपक्रम सुरू केला. महापालिका नसली तरी नागरिकांच्या समस्या थांबत नाहीत; त्या सोडवणे ही आमची जबाबदारी आहे.”

या उपक्रमामुळे प्रभाग २४ मध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासन काळातही लोकप्रतिनिधींची भूमिका किती महत्त्वाची असते, याचे हे ठळक उदाहरण ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button