
पुणे, दि. 3 : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधत पुण्यातील फुलेवाडा येथून प्रभाग क्रमांक २२ (काशेवाडी–डायस प्लॉट) मधील उमेदवारांच्या प्रचाराचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला. फुलेवाड्यातील महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांचे अधिकृत उमेदवार इंदिरा अविनाश बागवे, अविनाश बागवे, रफिक शेख व दिलशाद शेख यांच्या प्रचारास सुरुवात झाली.
यावेळी माजी राज्यमंत्री तथा काँग्रेस नेते रमेश बागवे यांच्या हस्ते महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आले. फुले दाम्पत्यांचा विचार हा समाजाला दिशा व ऊर्जा देणारा असल्याचे मत रमेश बागवे यांनी व्यक्त केले. महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी समाज प्रबोधन व शिक्षणासाठी दिलेले योगदान अतिशय मोलाचे असून त्यांचे विचार आणि कार्य पुढे नेणे ही आजच्या काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमास जुबेरबाबू शेख, विठ्ठल थोरात, तारक शेख, राजू शेख, पप्पू परदेशी, जावेद शेख, आरिफ शेख, उफक शेख, समिर शेख, सुरेखा खंडाळे, दीपक गायकवाड, सुरेश व्यास, सुंदरम, अरुण गायकवाड यांच्यासह पुणे शहरातील काँग्रेस व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.