
पुणे : नागरिकांच्या सेवेला सर्वोच्च प्राधान्य देत माझे सहकारी ‘२४ तास जनसेवा’ कार्यालयाच्या माध्यमातून अहोरात्र कार्यरत असून, आमदार हेमंतभाऊ रासने यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढे स्वतःही २४ तास प्रभागातील नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहीन, असा विश्वास भाजपाचे प्रभाग क्रमांक २५-ब मधील अधिकृत उमेदवार राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने राबवलेल्या विकासकामांचा लेखाजोखा जनतेपर्यंत पोहोचवून, शिस्तबद्ध संघटनात्मक बांधणीच्या जोरावर प्रभाग क्रमांक २५ मध्ये महाराष्ट्रातील सर्वात मोठा विजय मिळवण्याचा संकल्प कार्यकर्त्यांनी करावा, असे आवाहन आमदार हेमंत रासने यांनी यावेळी केले.
पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २५ मधील भाजपाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारासाठी आमदार हेमंत रासने यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यास प्रभागातील उमेदवार स्वरदा बापट, कुणाल टिळक, स्वप्नाली पंडित यांच्यासह माजी नगरसेवक दिलीप काळोखे, राजेश येनपुरे, माजी नगरसेविका गायत्री खडके, उदय लेले, मंडल अध्यक्ष अमित कंक, शहर चिटणीस मनोज खत्री, मंडल सरचिटणीस निलेश कदम, किरण जगदाळे, संतोष फडतरे, भाजयुमो शहर सरचिटणीस प्रणव गंजीवाले, महिला आघाडी मंडल अध्यक्ष मोहना गद्रे, प्रभाग महिला अध्यक्षा रुपाली कदम, प्रभाग अध्यक्ष सुनील रसाळ, युवा मोर्चा मंडल अध्यक्ष श्रेयस लेले आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या मेळाव्यात निवडणुकीचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले. केंद्र व राज्य सरकारच्या विकासकामे तसेच विविध कल्याणकारी योजनांची माहिती प्रभावीपणे मतदारांपर्यंत पोहोचविण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने ही निवडणूक जिंकून शनिवार पेठ–महात्मा फुले मंडई मतदारसंघासह पुणे शहराला विकासाच्या नव्या दिशेने नेण्याचा निर्धार व्यक्त केला.