लिपिक-टंकलेखक पदभरतीसाठी ऑनलाईन अर्जाला मुदतवाढ; आता ९ जानेवारीपर्यंत संधी

पुणे, दि. 3 : सैनिक कल्याण विभागातील लिपिक-टंकलेखक (गट-क) सरळसेवा पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या अंतिम मुदतीत वाढ करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांना आता ९ जानेवारी २०२६ रोजी रात्री ११:५९ वाजेपर्यंत अर्ज करता येणार असल्याची माहिती लेफ्टनंट कर्नल हंगे स. दै. (नि.), जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, पुणे यांनी दिली आहे.

या पदभरतीसंदर्भातील जाहिरात १२ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती, तर ७ डिसेंबर २०२५ रोजी शुद्धीपत्रक काढण्यात आले होते. मात्र तांत्रिक कारणांमुळे विभागाचे अधिकृत संकेतस्थळ २६ डिसेंबर २०२५ पासून निष्क्रिय झाल्याने अनेक उमेदवारांना अर्ज भरण्यात अडचणी येत होत्या. या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या सोयीसाठी अर्जाच्या मुदतीत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अर्ज भरण्यासाठी उमेदवारांनी खालील वेब लिंक किंवा QR Code/Application Code चा वापर करून थेट ऑनलाईन अर्ज करावा :
👉 http://cdn3.digalm.com/EForms/configuredHtml/32786/96173/Index.html

वेब लिंक किंवा QR Code संदर्भात कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास उमेदवारांनी deswpune@gmail.com
या ई-मेल आयडीवर तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button