
महादेववाडी येथील पवित्र भैरवनाथ महादेवांच्या साक्षीने शिवसेनेच्या प्रभाग क्रमांक ४१ व प्रभाग क्रमांक १६ मधील अधिकृत उमेदवारांच्या प्रचार मोहिमेचा विधीवत नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला. श्रद्धा, निष्ठा आणि जनतेच्या विश्वासाच्या बळावर सुरू झालेल्या या प्रचार मोहिमेने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण केले.
या वेळी प्रभाग क्रमांक ४१ चे अधिकृत उमेदवार प्रमोद नाना भानगिरे, स्वातीताई टकले, सारिका ताई पवार, मच्छिंद्र दगडे तसेच प्रभाग क्रमांक १६ चे अधिकृत उमेदवार शैलजाताई जयसिंग अण्णा भानगिरे यांच्यासह अनेक मान्यवर उमेदवार व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हिंदुत्वाचा ठाम विचार समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचवत, सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन प्रश्नांना प्राधान्य देणारी आणि विकासालाच केंद्रस्थानी ठेवणारी शिवसेना ही नेहमीच सर्वसमावेशक राजकारणाची ओळख राहिली आहे. कोणताही जात-धर्माचा भेद न करता सर्व घटकांना प्रतिनिधित्व देत शिवसेनेने महापालिका निवडणुकीच्या रणांगणात सक्षम कार्यकर्त्यांना संधी दिली आहे.
शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विकासाभिमुख कारभाराला अधिक गती मिळावी, तसेच प्रभाग क्रमांक ४१ व १६ मध्ये शिवसेनेचा भगवा अधिक जोमाने फडकावा, यासाठी भैरवनाथ महादेवांच्या चरणी साकडे घालण्यात आले. विक्रमी मताधिक्याने शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांना विजयी करण्याचा निर्धार यावेळी उपस्थित शिवसैनिक, पदाधिकारी व नागरिकांनी एकमुखाने व्यक्त केला.
या प्रसंगी सन्माननीय व प्रतिष्ठित नागरिक, पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या तसेच युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही लढाई विकास, विश्वास आणि स्वाभिमानाची असल्याचा ठाम संदेश यावेळी देण्यात आला.