नववर्षी महागाईचा झटका! १ जानेवारी २०२६ पासून व्यावसायिक LPG सिलेंडर ९.५० रुपयांनी महाग

पुणे दि. 1 : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्य नागरिकांसह व्यावसायिकांनाही महागाईचा फटका बसला आहे. १ जानेवारी २०२६ रोजी व्यावसायिक एलपीजी (LPG) गॅस सिलेंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे.

ताज्या अपडेटनुसार, १९ किलो वजनाच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीत ९.५० रुपयांची वाढ झाली असून, ही दरवाढ दिल्लीत लागू करण्यात आली आहे. हॉटेल, रेस्टॉरंट, केटरिंग व्यवसाय करणाऱ्यांसाठी ही दरवाढ खर्च वाढवणारी ठरणार आहे.

दरम्यान, १४.२ किलो वजनाच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. घरगुती गॅसचे दर सध्या स्थिर ठेवण्यात आले असून, त्यामुळे सामान्य ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी सिलेंडरच्या दरांचा आढावा घेतात. जागतिक बाजारातील कच्च्या तेलाचे दर, वाहतूक खर्च आणि इतर आर्थिक घटकांचा यावर परिणाम होत असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button