सिंहगड सोसायटीत राष्ट्रीय पक्षी मोराचे दर्शन; सिमेंटच्या जंगलात निसर्गाची मनमोहक झलक

पुणे दि. 31 :  आज सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास वडगाव खुर्द येथील सिंहगड सोसायटीमध्ये राष्ट्रीय पक्षी मोराचे अचानक दर्शन झाले. सिमेंटच्या जंगलात हरवलेली निसर्गाची ही झलक पाहून रहिवाशांची सकाळ अविस्मरणीय ठरली.

सकाळच्या शांत वातावरणात मोर शांतपणे फिरताना दिसताच परिसरात कुतूहल आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले. अनेक रहिवाशांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात हे दृश्य टिपले. शहराच्या वाढत्या कोंडीतही जैवविविधता अजूनही जिवंत आहे आणि निसर्ग मानवी वस्तीच्या आसपासही आपले अस्तित्व जपून आहे, याचा हा सुंदर संदेश देणारा क्षण ठरला.

पर्यावरणप्रेमींनी अशा घटनांकडे निसर्गसंवर्धनाची जबाबदारी म्हणून पाहण्याचे आवाहन केले आहे. झाडे जपणे, पक्ष्यांसाठी पाणी ठेवणे आणि त्यांच्या अधिवासाला धक्का न पोहोचवणे—यातूनच अशा मनमोहक दर्शनांची पुनरावृत्ती शक्य होईल, असे मत व्यक्त करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button