पुणे महापालिका निवडणूक : प्रभाग २२ ड मधून अविनाश बागवे, तर अनुसूचित जाती महिला प्रभाग २२ अ मधून इंदिरा बागवे यांचे उमेदवारी अर्ज दाखल

पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व मित्रपक्षांच्या वतीने प्रभाग क्रमांक २२ ड मधून अविनाश रमेश बागवे, तर अनुसूचित जाती महिला राखीव प्रभाग क्रमांक २२ अ मधून सौ. इंदिरा अविनाश बागवे यांनी आज आपले उमेदवारी अर्ज भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात अधिकृतपणे सादर केले.

यावेळी काँग्रेस, शिवसेना (उबाठा) तसेच महाविकास आघाडीतील मित्रपक्षांचे पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उमेदवारी अर्ज दाखल करताना कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत उमेदवारांना पाठिंबा दर्शविला.

अविनाश बागवे आणि सौ. इंदिरा बागवे हे दोघेही परिसरातील सामाजिक, शैक्षणिक व नागरी प्रश्नांवर सातत्याने कार्यरत असून, भवानी पेठ परिसराचा सर्वांगीण विकास, मूलभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते व सामाजिक न्याय या मुद्द्यांना प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

महाविकास आघाडीच्या माध्यमातून पुणे शहरात विकासाभिमुख, लोकाभिमुख आणि पारदर्शक प्रशासन देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button