
पुणे, दि. ३० : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रभाग क्रमांक ११ (अ) रामबाग कॉलनी–शिवतीर्थनगर येथील अधिकृत उमेदवार म्हणून श्री. हर्षवर्धन दीपक मानकर यांनी आपला नामनिर्देशन अर्ज दाखल केला. कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण सभागृह येथे त्यांनी अधिकृतपणे उमेदवारी अर्ज सादर केला.
यावेळी बोलताना श्री. मानकर यांनी प्रभागातील नागरी समस्या, पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, वाहतूक, स्वच्छता तसेच युवक व महिलांच्या प्रश्नांसाठी सातत्याने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. नागरिकांच्या अडचणींना प्राधान्य देत लोकहिताचे निर्णय घेणे हीच आपली भूमिका राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
रामबाग कॉलनी–शिवतीर्थनगर परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी पारदर्शक आणि जबाबदार नेतृत्व देण्याचा विश्वास त्यांनी यावेळी नागरिकांना दिला. त्यांच्या उमेदवारीमुळे प्रभागात राजकीय हालचालींना वेग आला असून राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.