
पुणे दि. 29 : गावच्या मातीत दडलेली सत्ता, अहंकार, सूड आणि संतापाची ज्वाला उघड करणारा जबरदस्त मराठी अॅक्शन-ड्रामा-थ्रिलर ‘सुड शकारंभ’ येत्या १६ जानेवारी २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ज्योती पाटील प्रस्तुत आणि राजनील फिल्म प्रोडक्शन निर्मित या चित्रपटाचा थरारक पोस्टर नुकताच प्रदर्शित झाला असून, त्याने प्रेक्षकांच्या उत्सुकतेत मोठी भर घातली आहे.
या पोस्टरमध्ये रक्ताने माखलेला हात दगड घट्ट पकडून उभा असल्याचे दिसते. हा दगड म्हणजे सूड, संताप आणि हिंसक संघर्षाचं प्रभावी प्रतीक आहे. साधी पार्श्वभूमी आणि लाल रंगातील धारदार शीर्षक चित्रपटाच्या गंभीर, वास्तवदर्शी आणि रक्तरंजीत कथेला ठळकपणे अधोरेखित करतं.
‘सुड शकारंभ’ या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शनाची जबाबदारी शोएब खतीब यांनी सांभाळली असून, त्यांनी ग्रामीण राजकारणातील काळी बाजू अत्यंत तीव्र आणि अंगावर काटा आणणाऱ्या पद्धतीने मांडली आहे. ज्योती पाटील यांच्या प्रस्तुततेखाली आणि राजनील फिल्म प्रोडक्शनच्या बॅनरखाली तयार झालेल्या या चित्रपटाचे सहयोगी निर्माता दत्तसंग्राम वासमकर आहेत.
चित्रपटात मनीषा मोरे, आयुष उलघडे, ओम पानस्कर, सुनील सूर्यवंशी, अनिल राबाडे, ऐश्वर्या मल्लिकार्जुन, सोनाली घाडगे, सलोनी लोखंडे, राज साने आणि मारुती केंगार यांच्या दमदार भूमिका पाहायला मिळणार आहेत.
कार्यकारी निर्माते श्रीराज पाटील, संगीत व पार्श्वसंगीत विकी वाघ आणि आर. तिरूमल, तर गायनात मनीष राजगिरे, हर्षवर्धन वावरे, विकी वाघ आणि मयुरी जाधव यांचा सहभाग आहे.
पॅनोरमा म्युझिकच्या लेबलखाली चित्रपटाचे संगीत प्रदर्शित होत असून, छायाचित्रण रोहण पिंगळ आणि अमेय तानवडे, संकलन रोहित रुकडे, कला दिग्दर्शन सोनाली घाडगे, तर पब्लिसिटी डिझाईन स्कारलेट स्टुडिओज् यांनी केले आहे. पी.आर. प्रज्ञा शेट्टी, सोशल मीडिया अश्मिकी टिळेकर, सीईओ राजेश मेनन यांचे सहकार्य लाभले असून सनशाईन स्टुडिओझ यांचेही मोलाचे योगदान आहे.
‘सुड शकारंभ’ हा केवळ चित्रपट नसून, सत्तेच्या खेळात माणूस कसा बदलतो, नाती कशी तुटतात आणि गावाच्या शांततेत कशी रक्तरंजित आग पेटते याचा थरारक आरसा आहे.
१६ जानेवारी २०२६ पासून जवळच्या चित्रपटगृहात ‘सुड शकारंभ’ नक्की पहा.