
पुणे दि. 29 : आज दिनांक २९ डिसेंबर २०२५ रोजी भारतीय जनता पक्ष व इतर मित्र पक्षांच्या महायुतीतर्फे पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 21 ड – मुकुंदनगर, सॅलिसबरी पार्क येथून सर्वसाधारण गटातून श्रीनाथ यशवंत भिमाले यांनी आपला उमेदवारी अर्ज अधिकृतरीत्या दाखल केला.
महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब, पुण्यनगरीचे खासदार व केंद्रीय राज्यमंत्री आदरणीय मुरलीधर अण्णा मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आदरणीय चंद्रकांतदादा पाटील, राज्यमंत्री आदरणीय माधुरीताई मिसाळ तसेच पुणे शहराध्यक्ष धीरजजी घाटे यांनी श्रीनाथ भिमाले यांच्या आजवरच्या कार्यावर विश्वास ठेवत पुन्हा एकदा मुकुंदनगर–सॅलिसबरी पार्क प्रभागाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली आहे.
या विश्वासाबद्दल पक्षातील सर्व सन्माननीय वरिष्ठांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करताना श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले की, आतापर्यंत लोकहिताच्या दृष्टीने केलेल्या कामांचा प्रवास पुढील काळातही अविरतपणे सुरू राहील. देशहित व पुणेकरांच्या सेवेला प्राधान्य देत भारतीय जनता पक्षाची पुणे महानगरपालिकेत सत्ता आणण्यासाठी आपण पूर्ण ताकदीनिशी कार्यरत राहू, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
या निमित्ताने त्यांनी पक्षातील सर्व वरिष्ठ नेते व मुकुंदनगर–सॅलिसबरी पार्क प्रभागातील नागरिकांचेही मनःपूर्वक आभार मानले.