पुणे महापालिका निवडणूक २०२५-२६ : पहिल्याच दिवशी २८८६ नामनिर्देशन फॉर्मची विक्री

पुणे, दि. 24 : पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ अनुषंगाने ४१ प्रभागांतून १६५ सदस्यांच्या निवडणुकीसाठी १५ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालये स्थापन करण्यात आली आहेत. या कार्यालयांकडून आज, मंगळवार दि. २३ डिसेंबर २०२५ रोजी एकूण २८८६ नामनिर्देशन फॉर्मची विक्री करण्यात आली असल्याची माहिती पुणे महानगरपालिकेच्या निवडणूक कार्यालयाने दिली आहे.

नामनिर्देशन फॉर्मची सर्वाधिक विक्री कसबा-विश्रामबागवाडा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून (३०० फॉर्म) झाली असून, सर्वात कमी विक्री कोंढवा-येवलेवाडी कार्यालयातून (५१ फॉर्म) नोंदविण्यात आली आहे.

इतर निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांमधील फॉर्म विक्री पुढीलप्रमाणे आहे —
येरवडा-कळस-धानोरी (१९५), नगर रोड-वडगाव शेरी (१९५), कोथरूड-बावधन (१९४), औंध-बाणेर (७३), शिवाजीनगर-घोले रोड (२७५), कै. बा. स. ढोले पाटील रोड (१७५), हडपसर-मुंढवा (१९९), वानवडी-रामटेकडी (१९९), बिबवेवाडी (२२१), भवानी पेठ (१९१), वारजे-कर्वेनगर (२२१), सिंहगड रोड (१९७) आणि धनकवडी-सहकारनगर (२००).

दरम्यान, आजच्या दिवशी कोणत्याही निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात एकही नामनिर्देशन पत्र दाखल झालेले नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता प्रभावीपणे राबविण्यासाठी महापालिका हद्दीत विविध आचारसंहिता पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत. निवडणूक प्रक्रिया मुक्त, पारदर्शी व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी ही पथके सतत कार्यरत राहणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button