अभिमानास्पद क्षण! नेपाळमध्ये झालेल्या पहिल्या साऊथ आशियाई गोल शॉट बॉल स्पर्धेत भारताचा दणदणीत विजय

पुणे दि. 22 : नेपाळची राजधानी काठमांडू येथे दिनांक 16 डिसेंबर 2025 ते 19 डिसेंबर 2025 दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या साऊथ आशियाई गोल शॉट बॉल स्पर्धेत भारतीय गोल शॉट बॉल संघाने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला.
हा विजय केवळ संघासाठीच नव्हे तर संपूर्ण भारतासाठी अभिमानास्पद क्षण ठरला आहे.

या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतासह पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ, मालदीव, भूतान आणि ओमान या देशांनी सहभाग नोंदवला होता. अत्यंत चुरशीच्या लढतींमध्ये भारतीय संघाने सातत्यपूर्ण आणि प्रभावी खेळ सादर करत अव्वल स्थान मिळवले.

भारतीय संघात खेळाडू म्हणून पूर्वा पाटील हिने सहभाग घेत उत्कृष्ट कामगिरी केली. तिच्या योगदानासह संघातील सर्व खेळाडूंनी सांघिक खेळाचे उत्तम उदाहरण सादर केले. या यशाबद्दल पूर्वा पाटील तसेच भारतीय गोल शॉट बॉल संघातील सर्व खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे.

भारतीय संघाच्या या ऐतिहासिक विजयामुळे देशातील खेळाडूंना नवी प्रेरणा मिळाली असून, पुढील आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button