बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय व ससून रुग्णालयात परिचारिकांसाठी निशुल्क कार्यशाळा; नॉन-क्लिनिकल

पुणे दि. २० : रोजी बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय व ससून रुग्णालय येथे परिचारिकांसाठी आवश्यक नॉन-क्लिनिकल कौशल्ये, मार्गदर्शन व नवीन दिशा या विषयांवर एकदिवसीय निशुल्क कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ही कार्यशाळा महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना (शासन मान्य) यांच्या वतीने, भारतीय परिचर्या परिषद यांच्या मार्गदर्शक सूचना व मा. न्यायालयाच्या आदेशानुसार आयोजित करण्यात आली.

राज्यातील परिचारिकांना नोंदणी नूतनीकरणासाठी १५० क्रेडिट तासांचे निरंतर व्यावसायिक शिक्षण (CNE) बंधनकारक असल्याने, या कार्यशाळेचा मोठा लाभ परिचारिकांना झाला.
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना (मुख्यालय लातूर) यांच्या राज्य सरचिटणीस सुमित्रा तोटे, अध्यक्षस्थानी अधिसेविका विमल केदार उपस्थित होत्या. यावेळी परिषदेच्या सदस्या सावरगावे, परिचर्या महाविद्यालयाच्या प्राचार्या मृण्मयी देशपांडे, कार्यशाळा निरीक्षक प्रभावती रणपिसे, पुणे शाखा अध्यक्षा आरीफा शेख, तसेच आयोजक अंजिता मेंढे व अश्विनी भावे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने झाली. प्रास्ताविक श्री डॅनियल मनोहर यांनी केले. अध्यक्षीय भाषणात श्रीमती विमलताई केदार यांनी संघटनेच्या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यशाळा निरीक्षकांनी उपस्थित परिचारिकांना दिवसभरातील विषयांचे ज्ञान आत्मसात करण्याचे आवाहन करत निशुल्क CNE आयोजनाबद्दल आयोजकांचे अभिनंदन केले.

या कार्यशाळेत डॉ. रुपाली साळवे, विमलताई केदार, दत्तात्रय कर्डिले, मृण्मयी देशपांडे व डॉ. राहुल पंडित आदी तज्ज्ञांनी विविध महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन केले.
सूत्रसंचालन बाबासाहेब कराळे व सुनिता गिते यांनी केले, तर आभार प्रदर्शन संघटनेच्या सहसचिव अश्विनी भावे यांनी केले.

कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी पुणे शाखेच्या अध्यक्षा आरीफा शेख, उपाध्यक्ष श्रीकांत गावडे, सचिव अंजिता मेंढे, खजिनदार निशा काळे व पौर्णिमा कांबळे, तसेच अनेक सभासद व स्वयंसेवकांनी मोलाचे सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button