लोकसेवेचा ‘परिसस्पर्श’: वडगाव शेरी–कल्याणीनगरच्या विकासाचा विश्वासार्ह चेहरा

पुणे, दि. 20 : नमस्ते सदा वत्सले मातृभूमी’ या मंत्राला केवळ उच्चार न ठेवता कृतीत उतरवणारे, निस्वार्थ समाजसेवेचा आदर्श घालून देणारे युवा नेतृत्व म्हणजे राहुल विठ्ठल दळवी आणि त्यांच्या कार्याला सदैव खंबीर साथ देणाऱ्या सारिकाताई राहुल दळवी. वडगाव शेरी व कल्याणीनगर परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी गेल्या १२ वर्षांपासून त्यांनी माणुसकीचा धर्म जपला असून, त्यामुळे आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ५ मधून त्यांच्याकडे आश्वासक चेहरा म्हणून पाहिले जात आहे.

संकटात धावून जाणारा नेता
कोरोनाच्या भीषण काळात भीतीचे सावट असताना दळवी दांपत्याने जीवाची पर्वा न करता जनसेवा केली. महापालिकेच्या स्वच्छता दूत महिलांना रेशन वाटप, सुमारे ४,००० गरजू कुटुंबांना घरपोच धान्य, मोफत आरोग्य शिबिरे व औषध वाटप—या माध्यमातून त्यांनी हजारो नागरिकांना आधार दिला.

विकासाची आधुनिक दृष्टी
रस्ते, पाणी, वीज, ड्रेनेज यांसह ‘कचरामुक्त परिसर’ ही त्यांची ठोस संकल्पना आहे. अनेकदा स्वतः रस्त्यावर उतरून स्वच्छता मोहिमा राबवत त्यांनी ‘ग्राऊंड लेव्हल’ कामाचा विश्वास निर्माण केला आहे. यामुळे कल्याणीनगर परिसराचा प्रत्यक्ष कायापालट होताना दिसतो.

शासकीय योजनांचा ‘वन-स्टॉप’ आधार
सर्वसामान्यांना सरकारी कागदपत्रांसाठी होणारी धावपळ ओळखून त्यांच्या जनसंपर्क कार्यालयातून मोफत सेवा देण्यात आल्या—

१६,७१९+ आधार कार्ड व ३,३४५+ रेशन कार्ड वितरण

१,६००+ रुग्णांना शहरी गरीब योजनेचा लाभ

१५०+ मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व ४,०००+ चष्म्यांचे वाटप

संघर्ष, संस्कृती आणि सामाजिक एकोपा
मराठा आरक्षणासाठी ९ दिवसांचे आमरण उपोषण, काश्मीरमधील भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ विराट मोर्चा—ही त्यांच्या राष्ट्रनिष्ठेची ठळक उदाहरणे आहेत. शिवछत्रपतींचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘किल्ले स्पर्धा’, महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम, पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी विसर्जन हौद, तसेच कृष्णा ग्रुपच्या वतीने भव्य दहीहंडी, शिवकालीन मर्दानी खेळ, विशेष घटकांचा सन्मान, पतंग वाटप व होळी निमित्त गोऱ्या वाटप असे उपक्रम सातत्याने राबवले जात आहेत.

लोकसेवा, विकास आणि संवेदनशील नेतृत्व यांचा समन्वय साधत दळवी दांपत्य वडगाव शेरी–कल्याणीनगरच्या उज्ज्वल भविष्यासाठी विश्वासार्ह पर्व घडवत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button